लग्नानंतर पती किंवा पत्नीचे बाहेर दुसऱ्या कोणासोबत संबंध असल्याचं समोर आल्यावर अनेक संसार मोडले आहेत. अशी अनेक प्रकरणे आपण पाहिली असतील पण पुण्यातून एख खळबळजनक घटना समोर आली आहे. पती आणि पत्नीची तीन वर्षांपासून कोर्टामध्ये घटस्फोटाची केस सुरू होती. यादरम्यान पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो नवऱ्यापर्यंत पोहोचले. फोटो पाहताच त्याचा राग अनावर झाला त्यानंतर त्याने जे काही केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.
आपल्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून पती राजीव कुमार संतापला होता. गेली तीन वर्षे घटस्फोटाची कोर्टात केस सुरू होती. तणावात असताना बायकोचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो त्याच्यापर्यंत पोहोचले. पती राजीव कुमार याने एक प्लॅन केला, राजीव कुमार हा बिहारमध्ये शिक्षक होता. राजीव कुमारने त्याच ठिकाणी काम करणाऱ्या बिहार येथील तरुणाला सोबत घेऊन पुणे गाठलं. पुण्यात आल्यावर त्याने पत्नीचा बॉयफ्रेंड प्रवीण कुमार महतो याचा पत्ता काढला.
प्रवीण कुमार हा त्याच्याच भावाच्या पुण्यातील बावधनमध्ये असलेल्या नर्सरीत पार्टनर म्हणून काम करत होता. आरोपी राजीव कुमारने मध्यरात्री एकच्या सुमारास झोपेत असलेल्या प्रवीण कुमार च्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. हत्या केल्यानंतर शिक्षक असलेल्या राजीव कुमारने पळ काढला. परंतु, पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जात असताना त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी आरोपी राजीव कुमार साथीदार धीरजकुमार रमोदसिंगला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, राजीव कुमार असं आरोपीचं नाव असून तो कौटुंबिक कलहमुळे तणावात होता. पत्नी गेल्या तीन- चार वर्षांपासून सोबत राहत नव्हती. त्यांची घटस्फोसाठी कोर्टात केस सुरू आहे. अशातच पत्नीचे बॉयफ्रेंड प्रवीण कुमार सोबतचे फोटो व्हायरल होत होते. ते फोटो राजीव कुमार याच्यापर्यंत आले होते.