पुणे: जिल्ह्यातील भोर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून दोन दरोडेखोरांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवार (17 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी पोलीस कोठडीच्या खिडकीतून पलायन केले. चंद्रकांत लोखंडे आणि प्रविण राऊत अशी पलायन करणाऱ्यांची नाव आहेत. दरोडेखोरांनी पलायन केल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोर दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हानं उभं राहिलं आहे. (Pune two robbers ran from Bhor Police station custody)
चंद्रकात लोखंडे आणि प्रविण राऊत या दोन्ही दरोडेखोरांना कापूरहोळ दरोडा प्रकरणी अटकेत होते. कापूरहोळ येथील ज्वेलर्सवर लोखंडे आणि राऊतच्या साथीदारांनी ऑगस्ट 2020 मध्ये दरोडा टाकला होता. या दरोड्यामध्ये त्यांनी 18 लाखांचा ऐवज लंपास केला होता. लोखंडे राऊतची टोळी पोलिसांच्या वेशात दरोडे टाकत होती. यावेळी दरोडेखोरांना ज्लेवर्सजवळील स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार केला होता.
चंद्रकांत लोखंडे आणि प्रविण राऊत यांच्या टोळीवर 14 ठिकाणी दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल आहेत. पुणे, सातारा आणि सोलापूरच्या विविध भागात दरोडे टाकले आहेत. बारामती, जेजुरी, राजगड, वडगांव निंबाळकर, लोणंद अशा भागात दरोडे टाकल्याचं उघडढालं होते.
पोलिसांसमोर आव्हान
14 दरोडे आणि पोलिसांच्या वेशात दरोडे टाकणाऱ्या चंद्रकांत लोखंडे आणि प्रविण राऊत यांनी पोलीस कोठडीतून पलायन केल्यानं पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे. कापुरहोळ दरोडा प्रकरणी लोखंडे, राऊत राजगड पोलिसांच्या ताब्यात होते. लोखंडे, राऊत टोळीतील सदस्य पुणे आणि सातारा परिसरातील होते. त्यांनी ग्रामीण भागातील विविध ज्वेलर्सवर दरोडे टाकले होते.
भाजप नेते अतुल भातखळकर यांचे ट्विट
महाराष्ट्रात आता दरोडेखोर पोलिसांचा गणवेश घालून दरोडे टाकू लागले आहेत. घरबशा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना भारतरत्नांची चौकशी, भाजपच्या आयटी सेलची चौकशी अशा महत्वपूर्ण कारवायांमुळे असल्या किरकोळ गुन्ह्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही… pic.twitter.com/4HLGQQBFEN
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 17, 2021
दरम्यान, या प्रकरणावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात आता दरोडेखोर पोलिसांचा गणवेश घालून दरोडे टाकू लागले आहेत. घरबशा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना भारतरत्नांची चौकशी, भाजपच्या आयटी सेलची चौकशी अशा महत्वपूर्ण कारवायांमुळे असल्या किरकोळ गुन्ह्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका त्यांनी केलीय.
संबंधित बातम्या:
सीबीआयच्या ताब्यातील तब्बल 45 कोटींचं सोनं गायब, सीबीआयच चौकशीच्या फेऱ्यात
हर्षवर्धन जाधवांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलांचा दानवेंवर आरोप!
मुथूट दरोडा प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 12 तासांत पाच आरोपींना अटक
(Pune two robbers ran from Bhor Police station custody)