चंदिगढ : पंजाबी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu) याचा कार अपघातात (Car Accident) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंगळवारी दिल्लीहून पंजाबला जाताना दीप प्रवास करत असलेल्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती, की गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे फोटो पाहायला मिळत आहेत. अपघाताच्या वेळी दीप त्याच्या मित्रांसोबत प्रवास करत होता. यावेळी त्यांच्या कारमध्ये एक महिलाही होती. कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर दीप सिद्धू सोशल मीडियावर चर्चेत आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपला जामीन मंजूर झाला होता.
अपघातानंतर दीप सिद्धूचा मृतदेह खरसौदा रुग्णालयात पाठवण्यात आला . या अपघाताची माहिती मिळताच दीप सिद्धूच्या अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. दीप सिद्धू देशभरात गाजलेल्या किसान आंदोलनावेळी चर्चेत आला होता. दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये घडलेल्या प्रकरणातही तो आरोपी होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता.
Visuals of the car from the accident site. Punjabi actor Deep Sidhu died in a road accident after he rammed his car into a standing truck near Pipli toll at Kundli-Manesar-Palwal (KMP) Expressway, as per Haryana Police pic.twitter.com/WL2MzT1hYd
— ANI (@ANI) February 15, 2022
दीप सिद्धू हा पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याचा जन्म 1984 मध्ये झाला होता. तो पंजाबी अभिनेता होता. दीप सिद्धूने कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. त्याने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्ड जिंकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
2015 मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘रमता जोगी’ रिलीज झाला. मात्र सिद्धूला 2018 मधील ‘जोरा दास नम्ब्रिया’ या पंजाबी चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.
सिद्धू अभिनय क्षेत्रासोबतच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही विख्यात होता. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सनी देओल यांच्या टीमने त्यांना स्वतःसोबत सहभागी करुन घेतले. जेणेकरुन तो स्थानिक लोकांना सनी देओल यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करु शकेल.
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर दीप सिद्धू सोशल मीडियावर चर्चेत आला होता. दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी फडकवलेल्या किसान युनियनच्या झेंड्याबद्दल आणि उफाळलेल्या हिंसेबद्दल दीप सिंह सिद्धूला जबाबदार ठरवले जात होते.
It wasn’t his time to go. Rest in Paradise Deep Sidhu. pic.twitter.com/bV4ibNxDPC
— Gurpreet S. Sahota (@GurpreetSSahota) February 15, 2022
संबंधित बातम्या :
दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला भडकवण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिप सिद्धुचं भाजप कनेक्शन? वाचा सविस्तर
पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू; किसान आंदोलनामुळे आला होता चर्चेत