राहुल गेटे धमकी प्रकरण, तपास करण्यासाठी पोलिसांची टीम तयार

| Updated on: Nov 02, 2022 | 3:58 PM

गडचिरोली पोलिसांचं पथक नवी मुंबईला जाऊन तपास करेल.

राहुल गेटे धमकी प्रकरण, तपास करण्यासाठी पोलिसांची टीम तयार
तपास गडचिरोली पोलीस करणार
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए राहुल गेटे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिल्याचं प्रकरण आहे. गडचिरोली पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे. नक्षल सेल नवी मुंबई पोलिसांना आता या प्रकरणी मदत करणार आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे पीए राहुल गेटे यांना धमकी आली. याचा तपास व चौकशी गडचिरोली पोलिसांनी सुरू केली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले, काल एक पत्र आम्हाला मिळालं. गडचिरोली पोलिसांची टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. याचे काही धागेदोरे आहेत का, याचाही तपास सुरू आहे. ते पत्र नवी मुंबईच्या पत्त्यावर गेलं होतं. नवी मुंबई पोलिसांशी आमचा संपर्क आहे. गडचिरोली पोलिसांकडून तपास सुरू आहे.

गडचिरोली पोलीस हे नवी मुंबई पोलिसांना मदत करणार आहे. गडचिरोली पोलिसांचं पथक नवी मुंबईला जाऊन तपास करेल. त्यांना काही गरज लागली तर आम्ही तयार आहोत. नक्षल कमांडरवर याचा संशय आहे. पण, सगळे अँगल्स तपासले जातील, असंही संदीप पाटील यांनी सांगितलं.

हे पत्र नक्षलवादांच्या पाठविल्याचा संशय आहे. त्यामुळं या घटनेकडं गांभीर्यानं पाहिलं जात आहे. राहुल गेटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए आहेत. पीएंना धमकी दिली गेली. त्यासाठी पत्र पाठविण्यात आले. हे पत्र नवी मुंबई पोलिसांना मिळाले.