अबू आझमींशी संबंधितांवर ठिकठिकाणी छापे, ‘या’ शहरातील भंगार मार्केटही रडारवर ?

| Updated on: Nov 26, 2022 | 11:46 AM

देशातील जवळपास तीस ठिकाणी ही कारवाई सुरू करण्यात आली असून राज्यातील मुंबई नंतर नाशिकमध्ये छापेमारी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अबू आझमींशी संबंधितांवर ठिकठिकाणी छापे, या शहरातील भंगार मार्केटही रडारवर ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : आझम खान, अबू आझमी, नवाब मलिक, कृपाशंकर सिंग, जगजबिका पाल, विकास दुबे या नेत्यांचा नाशिकच्या अंबडच्या भंगार मार्केटमध्ये नेहमीच राबता राहिला आहे. तशी सातपुर आणि अंबड पोलीसांच्या लेखी नोंदी आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरात आयकर विभागाकडून अबू आझमी यांच्या संबंधी विविध ठिकाणी छापेमारी केली जात असल्याची माहीत समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाच्या वतिने अबू आझमी यांच्या संबंधित भंगार मार्केटमधील व्यक्तींचीही चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नाशिकचे भंगार मार्केट पुन्हा एकदा रडारवर आले असून याबाबात भंगार मार्केटशी निगडीत असलेल्या घटकांमध्ये दबक्या आवाजात उलट-सुलट चर्चा आहे. नाशिकमधील सातपुर-अंबड लिंक रोड मोठा भंगार बाजार आहे. अनेक नेत्यांचा राबता आढळून आल्याने ही चौकशी होत असल्याची चर्चा आहे.

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार यांच्याशी संबंधित व्यक्तींवर छापेमारे सुरू असल्याची माहिती समोर आल्याने समाजवादी पक्षात खळबळ उडाली आहे.

देशातील जवळपास तीस ठिकाणी ही कारवाई सुरू करण्यात आली असून राज्यातील मुंबई नंतर नाशिकमध्ये छापेमारी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

या कारवाई दरम्यान भंगार व्यावसायिकांना आयकर विभागाने रडारवर घेतल्याची माहिती समोर आल्याने भंगार बाजार परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

छापेमारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या आठवड्यात नशिकसह मुंबई, कानपूर, वाराणसी, लखनौ व कोलकता येथे एकाच वेळी छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाची बाब म्हणजे उत्तर प्रदेशातील विनायक निर्माण लिमिटेड ही कंपनी आहे. आभा गुप्ता यांच्यासह अबू आझमी यांनी पैसा गुंतवला असून तो हवालाचा असल्याचा संशय प्राप्तीकार विभागाला आहे.