डोंबिवली : मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सोन्याचे दागिने (Gold Jewellery) लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्या (Thieves)ला क्राईम ब्रँचच्या मुंबई युनिटने मोठ्या कौशल्याने जेरबंद (Arrest) करण्यात यश मिळविले आहे. या बदमाशाकडून तब्बल 6 लाख 76 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सुरेंद्र भलेराम धानक (42) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या चोरट्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 130 ग्रॅम वजनाचे 6 लाख 76 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे.
विरार स्टार सिग्नेचर सोसायटीत राहणारे सुरेश सुबराया नायक हे 13 जून रोजी रात्री 9.18 च्या सुमारास उडपी रेल्वे स्टेशनवरुन मँगलोर-उद्यान या स्पेशल गाडीने कुटुंबियांसह प्रवास करत होते. ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सव्वाचारच्या खारबांव रेल्वे स्टेशनजवळ पोहचली. यावेळी कुणीतरी चोरट्याने यांच्या ट्रॉली बॅगेतील 7 लाख 56 हजारांचा ऐवज असलेला सोन्याच्या दागिन्यांचा डबा लंपास केला. याबाबत डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक पोलिसांसह लोहमार्ग क्राईम ब्रँचचे मुंबई युनिट समांतर तपास होते.
लोहमार्ग क्राईम ब्रँचचे खासगी गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजदार अशोक होळकर यांनी वरिष्ठांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी वपोनि अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक होळकर, जमादार गजानन शेडगे, हवालदार संदिप गायकवाड, अतुल साळवी, अतुल धायडे, रविंद्र दरेकर, वैभव शिंदे, अमित बडेकर, अनिल खाडे, सतीश धायगुडे, गणेश माने, शशीकांत कुंभार, इम्रान शेख, हरीश संदानशिव, सुनिल मागाडे यांनी ठाणे रेल्वे स्टेशनवर सापळा लावला. या सापळ्यात सुरेंद्र धानक या चोरट्याला बेड्या ठोकल्या. (Railway police arrested the thief who stole from the train and seized the jewellery)