जयपूर : प्राथमिक तपासात एकही पुरावा दिसत नसताना पोलिसांनी एका हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. राजस्थानातील झालावाड (Rajasthan Crime) जिल्ह्यातील सुनेल भागात पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं. दूबलिया-रायपूर मार्गावर एका व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण तिघा आरोपींना अटक केली आहे. कर्जावर घेतलेल्या रकमेच्या व्याजावरुन झालेल्या वादातून (Interest on Loan) ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
32 वर्षीय दुर्गाप्रसाद उर्फ दुर्गेश आणि 20 वर्षीय सुनील यांना अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी सुनेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुबलिया परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. मृतदेहाचा गळाही धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता. राधेश्याम डांगी असे मृताचे नाव असून तो मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील सोय कलान पोलीस स्टेशन क्षेत्रातील लुहरिया गावचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राधेश्याम हा व्याजावर पैसे द्यायचा. त्याने आरोपी दुर्गाशंकर आणि सुनील यांना व्याजावर पैसेही दिले होते. जास्त व्याजामुळे दोघांवर जास्त कर्ज झाले, आणि ते पैसे फेडू शकले नाहीत. या कारणावरून तिघांचा वाद झाला होता. त्यानंतर दोघांनी कट रचून राधेश्यामला निर्जनस्थळी नेले आणि धारदार शस्त्राने गळा चिरुन त्याचा खून केला. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत असून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरु आहे.
संबंधित बातम्या :
नवरा-बायकोचं एकत्र मद्यपान, नंतर मद्यधुंद पत्नीकडून पतीची हत्या
सीआरपीएफ जवानाची बायको, मेकॅनिकवर जीव जडला, अनैतिक संबंधातून जीव गमावला
बाबांनी विवाह ठरवला, तरुणीचा प्रियकरामागे लग्नासाठी तगादा, संतापलेल्या बॉयफ्रेण्डचं टोकाचं पाऊल