राजस्थान – आयआयटीची (IIT) तयारी करणाऱ्या छिंदवाडा येथील डॉक्टरांच्या (Doctor) एकुलत्या एक मुलाने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. जिथे तरुणाने आत्महत्या केली, तिथे पोलिसांना तरुणाच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये त्याने पालकांची माफी मागितली आहे. तर त्या मुलावर आपले खरे प्रेम असल्याचे लिहिले आहे. राजस्थानमधील (Rajasthan) कोटा येथील जवाहर नगर भागात तरुण वस्तीगृहात राहत होता. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.आई-वडिलांना आपल्या मुलाची बातमी कळताच त्यांची अवस्था दयनीय झाली.
छिंदवाडा येथील एका खासगी डॉक्टरचा 17 वर्षीय मुलगा गेल्या दोन महिन्यांपासून कोटा येथील आयआयटीची तयारी करत होता. शहरातील महावीर नगर येथील वसतिगृहात तो भाड्याने राहत होता. शुक्रवारी युवकाचा मृतदेह त्याच्या खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तरुणाच्या मित्रांनी सांगितले की तो शुक्रवारी सकाळी कोचिंगला गेला नाही. त्यामुळे मित्र दुपारी त्याच्या घरी पोहोचले, पण खूप ठोठावल्यानंतरही त्याने दरवाजा उघडला नाही. तो झोपला असावा, असे मित्रांना वाटले. मात्र शुक्रवारी सायंकाळी उशिराही मित्रांनी दार ठोठावले असता तरुणाने दरवाजा न उघडल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तरुणाचा मृतदेह लटकलेला होता. तो मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. छिंदवाडा येथे राहणाऱ्या तरुणाच्या पालकांना ही माहिती दिली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली असून त्यामध्ये तरुणाने ‘सॉरी, मम्मी पापा, मी कशाच्याही लायकीचा नाही’ असे लिहिले आहे. तुमचा मुलगा खूप लढला पण हरला. माझ्यावर इतके पैसे वाया घालवल्याबद्दल क्षमस्व. आता फक्त चुचूच्या शिक्षणाचा खर्च येईल. माझं प्रेम खोटं नव्हतं, माझं एका मुलावर प्रेम होतं, पण तेही खरं प्रेम होतं. माझे त्याच्यावर (तरुणाचे नाव) खूप प्रेम आहे.