जोधपूर : मुख्याध्यापक (Principal) आणि शिक्षिका नको त्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूरच्या ग्रामीण भागातील लुनी येथील सालावास गावात हा प्रकार घडला. हे प्रकरण 5 दिवस जुने असल्याचे सांगितले जात आहे, मात्र बदनामीच्या भीतीने ते आतापर्यंत लपवून ठेवण्यात आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाचे धाबे दणाणले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास लुनी सीबीईओकडे सोपवण्यात आला आहे. घटना घडल्यापासून मुख्याध्यापक आणि शिक्षिका दोघेही परागंदा झाले आहेत. या घटनेची तक्रार स्थानिक आमदाराकडेही करण्यात आली आहे. मुख्याध्यापकाला हटवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. या प्रकरणी चौकशी केल्यानंतरच कारवाई केली जाईल, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सालावास गावातील श्री अचलदास बागरेचा शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांचे त्याच परिसरात असलेल्या माध्यमिक शाळेच्या शिक्षकेसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. मुख्याध्यापकांनी नुकतेच संबंधित शिक्षिकेला आपल्या पीईईओ भागातील आपल्या शाळेत बोलावले होते. त्यानंतर दोघेही शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका खोलीत गेले.
गावकऱ्यांना याची कुणकुण लागताच सर्वजण एकत्र तिथे पोहोचले. दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर शिक्षण विभाग आणि लुनीचे आमदार महेंद्रसिंग बिश्नोई यांच्याकडे तक्रार करण्यात आली. मुख्याध्यापकाला हटवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. दुसरीकडे हे प्रकरण उघडकीस आल्यापासून शिक्षिका आणि मुख्याध्यापक दोघेही गायब झाले आहेत.
सालावास उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे की ते निर्दोष असून त्यांना कट रचून अडकवण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी शाळेत केलेली विकास कामे. परिसरातील खासगी शाळा चालकांमध्ये याबाबत जळफळाट असून हा कट रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शाळेच्या मागे असलेल्या खोलीत मुख्याध्यापक एकटेच राहतात. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रेमचंद सांखला यांनी दिले आहेत. चौकशीनंतरच कारवाई करू असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक हटवण्याचे आश्वासनही लुनीच्या आमदाराने ग्रामस्थांना दिले आहे.
संबंधित बातम्या :
कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला
17 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध, 27 वर्षीय विवाहितेला बेड्या, अकोल्यात काय घडलं?
14 वर्षांच्या चुलत भावासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, दहा वर्षांच्या चिमुरड्याची हत्या