6 महिन्यांच्या चिमुकल्यासह चौघांना मारलं, ओढत आंगणात आणलं अन् तिथंच जाळलं; राजस्थानमधील घटनेने देश हळहळला…

| Updated on: Jul 19, 2023 | 11:46 AM

Rajasthan News : गाढ झोपेत असताना 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह चार जणांची हत्या; राजस्थानमधील घटनेने अवघा देश हळहळला...

6 महिन्यांच्या चिमुकल्यासह चौघांना मारलं, ओढत आंगणात आणलं अन् तिथंच जाळलं; राजस्थानमधील घटनेने देश हळहळला...
Follow us on

जोधपूर, राजस्थान | 19 जुलै 2023 : राजस्थानमध्ये संपूर्ण कुटुंबाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह चार जणांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. या घटनेमुळे राजस्थानसह अवघा देश हळहळला आहे.

नेमकं काय घडलं?

राजस्थानच्या जोधपूरमधल्या ओसियांच्या चेराई गावात ही घटना घडली आहे. गाढ झोपेत असणाऱ्या कुटंबाला हत्या करत संपवण्यात आलं आहे. एक कुटुंब रात्री गाढ झोपलं होतं. तेव्हा काही लोक त्यांच्या घरात घुसले आणि या कुटुंबाला संपण्यात आलं. सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह चार जणांची हत्या करण्यात आली आहे. या अख्ख्या कुटुंबाची हत्या केल्यानंतर त्यांना ओढत घराच्या अंगणात आणण्यात आलं. तिथे त्यांना जाळण्यात आलं.

अख्ख्या कुटुंबाची हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

पोलीस घटनास्थळी

या घटनेनंतर स्थानिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसपी धर्मेंद्र सिंह यादव घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

शेजाऱ्यांना धूर दिसला अन्…

या कुटुंबाच्या हत्येनंतर त्यांना जाळण्यात आलं. त्यानंतर सकाळी गावातील लोकांना या घरातून धूर निघताना दिसला. शेजाऱ्यांना घरात जाऊन पाहिलं तर तेही हादरले. कारण घराच्या अंगणात चार मृतदेह पडले होते. यात सहा महिन्यांचं बाळाचाही मृतदेह होता. जो जवळपास सगळाच जळाला होता. तर इतरांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते.

स्थानिकांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा जोधपूर ग्रामीणचे एसपी धर्मेंद्र सिंह यादव चेराई गावात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. लगेच फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आलं. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले.

पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहे. हत्या नेमकी कशाने करण्यात आली? ही हत्या कुणी केली? कोणत्या कारणासाठी करण्यात आली?, या सगळ्या प्रश्नांचा पोलीस तपास करत आहेत.