जयपूर | 11 ऑक्टोबर 2023 : शादी का लड्डू… खावासा तर सगळ्यांनाच वाटतो, पण ते ( लग्न) सगळ्यांनाच पचतं असं नाही. राजस्थानमध्ये अशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिच्याशी लग्न करण्यासाठी वरात घेऊन नवरदेव १३ दिवस आंदोलन करत होता, तीच त्याच्या जन्माची साथीदार त्याला सोडून पळून गेल्याने मोठा धक्का बसला आहे. विवाहीत मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने माहेरची लोकही हादरले आहेत. तिचा सगळीकडे शोध घेतला, पण सापडली तर ती कुठेच नाही. याप्रकरणी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली आहे.
राजस्थानच्या पालीमध्ये हा अजब प्रकार घडला आहे. तेथील सेणा गावातील एक तरूणींच लग्न ठरलं होतं, मात्र सप्तपदीपूर्वीच ती पळाली होती. ते पाहून तिचा होणारा नवरा आणि सासरच थेट उपोषणालाच बसले. तब्बल १३ दिवस ते तिच्या घरासमोर ठिय्या देऊन बसले. अखेर ती परत आली, लग्नही झालं, सगळेच आनंदी होते. पण मध्येच काय झालं काय माहीत, ती विवाहीत मुलगी माहेरी आली आणि तिथून पुन्हा पळून गेली.
लग्नापूर्वीही गेली होती पळून
3 मे रोजी सेना गावातील या मुलीचा विवाह ठरला होता. सगळी तयारी झाल्यानंतर लग्न लागणारचं होतं, तेवढ्यात नवरी प्रियकरासह पळून गेली. वधू निघून गेल्यानंतर वराकडचे संतापले आणि त्यांनी वधूच्या कुटुंबीयांकडे तिला शोधून परत आणण्याची मागणी केली. ते थेट वधूच्या घराबाहेर आंदोलनासाठीच बसले. वऱ्हाडी 13 दिवस तिथेच तळ ठोकून बसल्याने वधू अखेर परत आली आणि लग्न केलं. पण लग्नानंतर माहेर आल्यावर पुन्हा पळून गेली.
मुलीच्या वडिलांनी काय सांगितलं ?
याप्रकरणी विवाहीत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांची मुलगी 4 ऑक्टोबर रोजी सासरहून माहेरी आली होती. 6 ऑक्टोबर रोजी घरी परत जाण्यासाठी तिने सासू आणि सासऱ्यांना परत फोनही केला होता. पण अचानक काय झालं कळलंच नाही. रात्री सगेळ झोपल्यानंतर ती एका तरूणासोबत पळूनच गेली. चार दिवसांपासून आम्ही तिचा शोध घेत आहोत. मे महिन्यात तिचं लग्न होतं तेव्हाी ती पोटदुखीचा बहाणा करून ३ मे रोजी लग्नातून पळून गेली होती. पण वराकडचे 13 दिवसअडूनच राहिल्याने ती परत आली आणि 16 मे रोजी आम्ही तिचं लग्न लावलं, असंही वडिलांनी नमूद केले.
मिठाईच्या दुकानात काम करायचा पती
वराचे कुटुंब सिरोही जिल्ह्यातील कैलाश नगरचे रहिवासी आहे. तो आंध्रर प्रदेशातील एका मिठाईच्या दुकानात काम करत होता. लग्नाआधी आणि आता परत वधू पळून त्याने गेल्याने त्याने तर डोक्यालाच हात लावला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.