केरे पाटलांचा आत्महत्येचा प्रयत्न, बायकोसह नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

| Updated on: Oct 16, 2022 | 5:54 PM

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नावाने मागील काही दिवसांपासून आर्थिक विषय असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

केरे पाटलांचा आत्महत्येचा प्रयत्न, बायकोसह नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
Image Credit source: TV9 Network
Follow us on

संजय सरोदे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे-पाटील (Ramesh Kere Patil) यांनी विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide Attempt) केला आहे. फेसबूक लाईव्हच्या (Facebook live) माध्यमातून त्यांनी आत्महत्या करत असल्याचे म्हंटले आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना रमेश केरे पाटील यांच्या पत्नी आशाताई केरे या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात पोहोचून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे, ज्यांनी ज्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीची तक्रार यावेळी रमेश केरे पाटील यांच्या पत्नी आशाताई केरे केली आहे. मागील काही दिवसांपासून केरे – पाटील यांच्या नावाचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संवाद साधत होते.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नावाने मागील काही दिवसांपासून आर्थिक विषय असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

त्या ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत माझी बदनामी केल्याचा दावा रमेश पाटील यांनी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केरे पाटील यांनी जीवन यात्रा संपवत असल्याचे सांगत विषप्राशन केले आहे, त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे.

मुंबईतील जे जे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या पत्नी, भाऊ,मुले आणि इतर नातेवाइकांनी औरंगाबादेतील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी लेखी तक्रार करत आशाताई केरे पाटील यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.