डोंबिवली : डोंबिवलीत अनधिकृत बांधकामाच्या नावावर बिल्डरांकडून 8 कोटी (Illegal Construction In Dombivali ) उकळणाऱ्या 4 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बिल्डरांनी चौघांना त्वरित अटक करुन आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे (Illegal Construction In Dombivali).
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात काही इमारतींचे काम सुरु आहे. या परिसरात काही वर्षांपासून बिल्डर वर्गीस म्हात्रे, विक्रांत सिंग आणि काही बिल्डर इमारतीचे बांधकाम करीत आहेत. या बिल्डरांना अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली ब्लॅकमेल करुन 8 कोटी रुपये उकळल्याचा आरोप विद्या म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, एकनाथ म्हात्रे आणि सुनील म्हात्रे यांच्यावर करण्यात आला आहे.
याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकार परिषद घेऊन बिल्डर हितेन वर्गीस म्हात्रे आणि आर्य विक्रम सिंग यांनी मागणी केली आहे की, सदर महिला आणि तिच्या नातेवाईकांनी वारंवार आम्हाला ब्लॅकमेल करुन आत्तापर्यंत 8 कोटी रुपये घेतले आहेत. त्यामध्ये काही फ्लॅटचा देखील समावेश आहे. हे पैसे चेक द्वारे दिले गेले आहेत. या महिलेला आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करुन आम्हाला न्याय दिला पाहिजे. सदर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचे वैध करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे बिल्डरांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, या गुन्ह्याचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी या गुन्ह्याचा तपास विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात या चौघांविरोधात जी तक्रार करण्यात आली आहे. त्याचा सखोल तपास सुरु आहे. सदर आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
फेसबुकवरची ओळख पडली महागात; व्यापाऱ्याला 30 लाखाला गंडा, दापोली पोलिसात तक्रारhttps://t.co/ii52bUiKZ9#Facebook #fraud #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020
Illegal Construction In Dombivali
संबंधित बातम्या :
कचरा टाकण्यावरुन वाद, स्वच्छता मार्शल महिलेचा एका व्यक्तीवर टोकदार चावीने वार, डोंबिवलीत घटना
जीवनसाथी डॉट कॉमवरून महिलांची फसवणूक करणाऱ्याला अटक; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त