रत्नागिरी समुद्र किनारपट्टीवर सापडलेल्या 102 किलो चरस प्रकरणात मोठी अपडेट समोर

| Updated on: Sep 01, 2023 | 12:28 PM

Ratnagiri Police : अलिबाग पोलिसांनी ही पाकिटे जप्त केली आहेत. आतापर्यंत तब्बल साडे सहा कोटींपेक्षा जास्त किंमतीची पाकिटे सापडली आहेत. हा पाकिटे नेमकी आलीत कशी याचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी समुद्र किनारपट्टीवर सापडलेल्या 102 किलो चरस प्रकरणात मोठी अपडेट समोर
Follow us on

रत्नागिरी : राज्यातील किनारपट्टींवर समुद्र किनारपट्टींवर अंमली पदार्थ वाहत आल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील पाच समुद्र किनाऱ्यांवर पाच कोटींचे अंमली पदार्थ असलेली पाकिटे सापडली होतीत. त्यानंतर आता अलिबागमधील आक्षी समुद्र किनाऱ्यावर 25 लाखांची सहा पाकिटे वाहून आलीत. अलिबाग पोलिसांनी ही पाकिटे जप्त केली आहेत. आतापर्यंत तब्बल साडे सहा कोटींपेक्षा जास्त किंमतीची पाकिटे सापडली आहेत. हा पाकिटे नेमकी आलीत कशी याचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

पोलिसांनी काय निर्णय घेतलाय?

रत्नागिरी- कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या मोठ्या प्रमाणातील चरस प्रकरणाचा छडा लावण्यासाठी रत्नागिरी पोलीस इंटरपोल एजन्सीची मदत घेणार आहे. इंटरपोलच्या माध्यमातून इतर देशांना गुन्हे कार्य पद्धती माहिती कळवली जाणार आहे. रत्नागिरी पोलिसांकडून त्या संदर्भातील Purple Notice नोटीस प्रसिद्ध करण्याची विनंती इंटरपोलला केली आहे. सर्व किनारपट्टीवरी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

बुधवारी रेवदंडा समुद्र किनारी ही एक कोटी किमतीची पाकिटे सापडली होती. श्रीवर्धन समुद्र किनारीही गुरुवारी 12 पाकिटे सापडली आहेत. याची किंमत पन्नास लाखाच्या घरात आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात साडे सहा कोटी किमतीची दीडशेहून अधिक अंमली पदार्थाची पाकिटे सापडली आहेत. त्यामुळे पाकिस्तान मधून आलेल्या बोटीतून समुद्रमार्गे आलेली ही अंमली पदार्थ पाकिटे नक्की कुठे नेण्यात येत होती याबाबत कारण स्पष्ट झालेले नाही आहे.

दरम्यान, समुद्र किनारी आलेली अंमली पदार्थांची पाकिटे नेमकी कुठून आलीत त्यासोबतच हा पाकिटे इतक्या प्रमाणात कशी येत आहेत? ठरवून कोण काही असा करत आहे की समुद्रातून चुकीच्या पद्धतीने वाहतूक करत असून त्यातून ही चुकून तर नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.