नवी दिल्ली : वसईतील रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर हिच्या दिल्लीत झालेल्या क्रूर हत्येने देशभरात खळबळ माजली आहे. श्रद्धाची हत्या तिच्याच लिव्ह इन पार्टनरने केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करुन ते दिल्लीतील मेहरोली आणि छतरपूर परिसरातील जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलीस आपल्यापर्यंत कधीच पोहचू शकत नाहीत, असे आरोपीला वाटले होते. मात्र दोन महिन्यांपासून श्रद्धाशी संपर्क होत नसल्याचे तिच्या मित्राने तिच्या वडिलांना सांगितले. वडिलांनी पोलीस धाव घेत मिसिंग तक्रार दाखल करताच सहा महिन्यानंतर ही खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली.
घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आणि आरोपी आफताब पुनावाला याला अटक केली. दिल्ली पोलिसांनी आफताबची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. पोलिसांना दिलेल्या जबाबात आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली आणि हत्येनंतर 20 दिवस आफताबने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडे कथन केला.
18 मे बुधवारी रात्री. रात्रीची वेळ होती, नक्की टाईम माहित नाही. पण सूर्य बुडाला होता. आम्ही जेवलो नव्हतो. त्याच दरम्यान काही कारणावरुन वाद सुरु झाला आणि नंतर लग्नावरुन वाद वाढत गेला. मग मी तिला धक्का मारला, त्यानंतर श्रद्धाने मला धक्का मारला.
दोघांमध्ये झटापट सुरु झाली. मग मला खूप राग आला. झटापटीत श्रद्धा खाली जमिनीवर कोसळली. मग मी तिच्या छातीवर बसलो आणि दोन्ही हातांनी जोर लावून तिचा गळा पकडला. गळा पकडून दाबत राहिलो. ती धडपड करत होती.
थोड्या वेळाने तिचे हातपाय ढिले पडले. मला वाटलं कदाचित ती बेशुद्ध झाली. मग पाहिलं तर तिचा श्वास चालत नव्हता. तिच्या नसा बंद पडल्या होत्या. मग मी समजलो ती मेली. पण मला कोणताही पश्चाताप नाही.
हे सर्व रागात झालं होतं. त्याआधी 18 मे च्या संध्याकाळपर्यंत माझ्या डोक्यातही नव्हतं मी श्रद्धाची हत्या करेन. पण त्या दिवशी अशा गोष्टी घडल्या, मला राग आला आणि मी तिची हत्या केली. जे घडलं ते अचानक घडलं, काही प्लानिंग नव्हतं.
पुढे तो म्हणाला, हत्या झाली, त्यानंतर मला भीती वाटली. पकडला जाईन, काय होईल? तो म्हणाला, छतरपूरमध्ये ज्या घरी तो राहत होता तिथे क्वचित त्याचे एक-दोन मित्र यायचे. बाकी कुणी येत नसे. मित्रही जेव्हा आम्ही घरी असायचो तेव्हा फोन करुनच यायचे. त्यामुळे घरी कुणी मित्र येणार नाही, याबाबत मी निश्चिंत होतो.
दुसरे, श्रद्धाचे घरचे तिच्यापासून वेगळे राहत होते. श्रद्धानेही त्यांना सोडले होते. 2020 नंतर ती घरच्यांशी मोबाईलवरही बोलत नव्हती. दोन वर्षात कधी कुणी संपर्कात राहिले नाही, त्यामुळे श्रद्धाला शोधत तिचे घरचे येथे येतील असे वाटले नव्हते.
माझ्या घरच्यांबद्दल विश्वास होता. त्यांना माहित होते, मी कुठे आहे, काय करतो. कुणाला काळजी नाही, त्यामुळे अचानक ते येथे येतील, या सर्व गोष्टांबाबत मी निश्चिंत होतो.
मला चिंता याचीच होती ती जेथे राहतो तेथील आजूबाजूच्या शेजाऱ्यांची, त्यांना माहिती होऊ नये. सर्वात मोठं टेन्शन हे होतं की, मृतदेह लवकरात लवकर घराबाहेर काढायचा. नाही काढला तर गरमीचा महिना आहे, मृतदेहाला वास येऊ लागेल आणि शेजाऱ्यांना कळेल.
मी खूप विचार केला. त्यानंतर श्रद्धाचा मृतदेह खोलीतून बाथरुममध्ये नेऊन ठेवला आणि दरवाजा लावून घेतला. त्यानंतर बिछान्यात पडून विचार करु लागलो आता पुढे मला काय करायचे आहे. मग मला भूक लागली. मी जेवण ऑर्डर केले, जेवलो आणि शांतपणे झोपून गेलो.
सकाळ होताच त्याने ठरवले होते, त्याला पुढे काय करायचे आहे. सकाळी उठलो कपडे बदलले. त्या दिवशी मी अंघोळ केली नाही, कारण बाथरुममध्ये मृतदेह होता. कपडे बदलले पैसे घेतले आणि घराबाहेर गेलो. त्याला माहित होते फ्रिजच्या कोणत्या साईजमध्ये एक मृतदेह आणि त्याचे तुकडे बसतील.
लोकल मार्केटमधून 300 लिटरचा फ्रिज खरेदी केला. फ्रिजवाल्याला पैसे दिले, घरचा पत्ता दिला. दुकानवाल्याने सांगितले आम्ही एवढ्या वेळेत पोहचू. त्याआधी मला घरी पोहचायचे होते, कारण घराला टाळे लावले होते.
मग दुसऱ्या दुकानात गेलो तिथे करवत खरेदी केले. त्यानंतर एका दुकानातून काळ्या रंगाच्या डस्टबीनमध्ये वापरतात त्या पिशव्या घेतल्या. करवत आणि पिशवी घेऊन घरी आलो. काही वेळाने फ्रीज घरी आला.
मजुरांनी दरवाजाच्या आत फ्रीज ठेवताच मजुरांना पैसे देऊन पाठवून दिले. त्यानंतर फ्रीज बॉक्समधून बाहेर काढत प्लग लावून सुरु केला. चेक करण्यासाठी पाण्याच्या बाटल्या ठेवल्या. दूधाचे भांडेही आत ठेवले. बाकी काही सामान नव्हते.
मग संध्याकाळ होता होता तो बाथरुममध्ये गेलो. बाथरुममध्ये मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरवात केली. काही तुकडे केले मग असे वाटले वास येतोय. बाकी मृतदेह बाथरुममध्ये आणि तुकडे पिशवीत टाकून फ्रीजरमध्ये ठेवले.
करवतीने मृतदेहाचे तुकडे करण्यास अडचण येत होती. दोन-तीन त्याने घालवले, मग मला असे वाटले करवतीने तुकडे होत नाहीत. मला भिती पण होती की एकसाथ हे करतोय माहित नाही काय होईल.
मृतदेहाच्या तुकड्यांची जी दोन तीन पिशवीची पाकिटं बनली, ती त्याने फ्रीजरमध्ये ठेवली. बाकीचा जो मृतदेह बाथरुममध्ये होता, तो फ्रीजच्या खालच्या बाजूला ठेवला. मृतदेह ठेवण्यासाठी फ्रीजमधील ट्रे वगैरे बाहेर काढले. फ्रीज हाय कुलिंगवर ठेवला.
मग बाथरुम साफ केले, घर साफ केले. सर्व केल्यानंतर 19 तारखेच्या रात्री तो कुठेही गेलो नाही. थकलो होता आणि मला पकडले जाण्याची भीतीही होती. मी जेवून झोपून गेलो. 20 तारखेला दुपारपासून पुन्हा मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरवात केली. अखेर रात्रीपर्यंत मृतदेहाचे तुकडे करुन झाले.
पकडले जाऊ नये म्हणून तुकडे करताना ते छोटे छोटे करण्याचा प्रयत्न केला. मग सर्व तुकडे पिशव्यांमध्ये घालून पॅकेट बनवले आणि फ्रिजमध्ये टाकले. जे तुकडे रात्री फेकणार होतो, ते फ्रिजरमध्ये टाकले आणि जे तुकडे एक एक करुन नंतर फेकणार होतो, ते फ्रीजच्या खालच्या भागात ठेवले.
जेव्हा वाटायचे हे फ्रिजरमधील तुकडे अधिक गोठलेत, तेव्हा ते फ्रिजरमधील तुकडे खालच्या भागात ठेवायचो आणि खालच्या भागातील तुकडे फ्रिजरमध्ये ठेवायचो. हे काम दर दोन तासांनी करायचो.
20 तारखेला तो बाजारात गेला. त्याने घर साफ करण्यासाठी सल्फर हायपोक्लोरिक खरेदी केले. अॅसिडने घराची, बाथरुमची चांगली स्वच्छता केली. पहिल्यांदा 20-21 च्या रात्री म्हणजे 18 मे ला हत्या झाल्यानंतर 48 तासानंतर 20 च्या रात्री घरातून निघालो.
पहिल्या दिवशी एक-दोन पिशव्या आपल्या बॅगेत ठेवल्या आणि घरातून निघालो. मला माहित नव्हते कुठे जायचे आहे. त्या घरात येऊन आम्हाला 3-4 दिवसच झाले होते. फक्त एवढेच माहित होते, मेहरोलीत जंगल आहे. तेथे कुतुबमिनार आहे. तेथे रात्रीच्या वेळी जास्त कुणी फिरकत नाही, निर्जन परिसर आहे.
मी पहिल्या दिवशी मेहरोलीचे जंगल निवडले, मात्र जास्त आत गेलो नाही, कारण घाबरत होतो, आत काय आहे माहित नाही. थोडा आत गेलो आणि बॅगेतून पिशव्या काढून फेकत निघून गेलो.
तेथून परत येताना मी परिसराची रेकी केली. आपल्या घरापासून इथपर्यंत कुठे पोलिसांची गस्त असते का? कुटे बॅरिगेट्स आहेत का? हे पाहिले. मात्र कुणीही दिसले नाही. मला वाटले हेच बेस्ट आहे.
घरी आलो आणि झोपून गेलो. 22 मे रोजी घरीच होतो. कुठे बाहेर गेलो नाही, शेजाऱ्यांशी बोललो नाही. मग रात्री पहिली दिवशीपेक्षा जास्त तुकडे काढले. रात्री 2 वाजता घरुन निघालो आणि पहिल्या दिवशी गेलो तिथे गेलो नाही. दुसरी निर्जन जागा पाहिली जिथे जंगल आहे, झाडी आहे, तिथे मृतदेहाचे तुकडे टाकून घरी परत आलो.
घरी परतल्यानंतर मला आठवतले, परिवारातील कुणी विचारत नाही, पण श्रद्धा आपल्या मित्रमैत्रिणींशी सोशल मीडियावर कनेक्ट राहते, खासकरुन इन्स्टाग्रामवर, फेकबुकवर. काही ना अपडेट टाकत राहते. व्हॉट्सअपवर बोलत राहते, इन्स्टाग्रामवर अपडेट टाकत राहते.
मला परिवाराची चिंता नव्हती, पण मित्रांसोबत कॉन्टॅक्ट नाही झाला तर ते विचारत राहणार. मग मी श्रद्धाचे जेवढे प्रोफाईल आहेत, ते स्वतः ऑपरेट करु लागलो. इन्स्टाग्रामवर वगैरे कुणी हाय हॅलो केले की रिप्लाय द्यायचो. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर पण रिप्लाय करायचो.
फक्त फोन उचलायचे नाही. पण मॅसेज आला की रिप्लाय द्यायचा. त्यामुळे मित्रांना पण विश्वास बसला श्रद्धा ठीकठाक आहे. दुसरीकडे रोज रात्री मी तुकडे फेकत होतो.
रोज रात्री हे करत होतो आणि मला कुणी पाहत नव्हते, कुणी रोखत नव्हते, तसा माझ्यात आत्मविश्वास वाढत गेला. मला विश्वास बसला होता, पोलीस मला पकडू शकणार नाही. मग शेवटच्या ज्या पिशव्या होत्या, त्या एक एक करुन टाकत होतो. त्यासोबतच फ्रीजरमधील मृतदेहाचे तुकडे रिप्लेस करण्यासही विसरत नव्हतो.
अगरबत्ती घेऊन आणली, रुम फ्रेशनर घेऊन आलो, अॅसिड पण होते. संशय येऊ नये की रोज का साफसफाई करतो, असा कुणाला संशय येऊ नये म्हणून रोज दरवाजा बंद करुन साफसफाई करायचो.
मोठ्या शहरात शेजारी कोण आहे, काय करतो याची कुणाला चिंता पडलेली नसते. त्यामुळे माझे काम खूप सोपे झाले. मला नक्की आठवत नाही, पण 4,5 किंवा 6 जूनला जेव्हा मी शेवटची पिशवी उचलली, बॅगेत ठेवली आणि फेकून आलो. शेवटची पिशवी फेकल्यानंतर मला खात्री झाली की, पोलीस आपल्याला पकडू शकत नाही.
दिल्लीत कुठे मृतदेहाचे तुकडे आढळल्याची बातमी येतेय का हे जाणून घेण्यासाठी मी सारखा न्यूज चॅनेल पहायचो, बातम्या वाचायचा. रोज पहायचो कुठे काही बातमी छापलेली नसायची, त्यामुळे मी आणखी निश्चिंत झालो.
मग मला वाटले मी योग्य ठिकाणी तुकडे फेकले, जंगलात प्राणी पण असतात. त्यात गरमीचा महिना आहे, त्यामुळे मृतदेह चांगल्या स्थितीत राहूच शकत नाही. हे सर्व मी 20 दिवसात केले. त्यानंतर पूर्ण घर साफ केले.
मी लगातार घराची साफसफाई करत होतो. फ्रीजही अनेक वेळा साफ केला, भिंती, चादरी, स्वतःचे कपडेही अनेक वेळा धुऊन काढले. जिथे जिथे वाटले इथे अॅसिडने धुवण्याची गरज आहे तिथे अॅसिडने धुतले.
मी क्राईम शो मध्ये पाहिले होते, फॉरेन्सिक चाचणी कशी होते. मला माहित होते, कधी ना कधी श्रद्धाला शोधायला कुणी आले आणि या घरापर्यंत पोहचले तर या घराची तपासणी होईल आणि फॉरेन्सिक टीमही येईल. त्यामुळे छोट्यातील छोटा पुरावाही नष्ट करण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपरा न कोपरा लगातार साफ करत होतो.
मृतदेहाचे तुकडे फेकण्याचे सर्व काम 20-22 दिवसात संपले. या दरम्यान घरातच असायचो कुठेही बाहेर जायचो नाही. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह रहायचो. याच दरम्यान 25 मे ते 5 जून दरम्यान एका डेटिंग अॅपवर दिल्लीतील एका मुलीशी ओळख झाली.
एका रविवारी मी तिला घरी बोलावले. माझ्याकडे पैसेही जास्त नव्हते कुठे बाहेर जाण्यासाठी आणि घर बंद करुन जाऊ पण शकत नव्हतो. घरात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे असताना मी नवीन मैत्रिणीला घरी बोलावले.
पण ती मैत्रिण घरी येण्याआधीच फ्रीजमधील मृतदेहाचे तुकडे काढून कपाटात ठेवले. फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि बाकी वस्तू ठेवल्या. ती मैत्रिण घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी एक तास घरात एकत्र वेळ घालवला आणि मग ती निघून गेली. ती गेल्यानंतर पुन्हा ते कपाटातील मृतदेहाचे तुकडे काढून फ्रीजमध्ये ठेवले.
श्रद्धाच्या मृतदेहाचे सर्व तुकडे फेकल्यानंतरही ते घर सोडले नाही. कारण मला आत्मविश्वास होता की, पोलीस माझ्यापर्यंत पोहचू शकत नाहीत. श्रद्धाला कुणी शोधणारं नाही, आई-वडिल विचारत नाही. श्रद्धाचे सोशल मीडिया अकाऊंट मी स्वतः हँडल करत होतो, त्यामुळे मित्र-मैत्रिणींनाही खात्री पटली होती श्रद्धा ठीक आहे.
जुलैपर्यंत म्हणजे हत्या झाल्यानंतर जवळपास अडीच महिने श्रद्धाचे सोशल मीडिया अकाऊंट हँडल करत होतो. त्यानंतर श्रद्धाच्या मित्र-मैत्रिणींना रिप्लाय देणे बंद केले. यादरम्यान वसईत आपल्या घरी आलो होतो. त्यावेळी श्रद्धाचा मोबाईल पण त्याने तिथेच तोडफोड करुन फेकून दिला. नंतर पुन्हा दिल्लीत आलो आणि त्याच छतरपूरमधील घरी राहू लागलो.
मात्र श्रद्धाचे काही मित्र जे रोज तिच्याशी बोलायचे, ते श्रद्धा सोशल मीडियात अनअॅक्टिव्ह झाल्याने हैराण झाले. श्रद्धा मॅसेजला रिप्लाय देत नव्हती, दोन-अडीच महिने श्रद्धाकडून रिप्लाय येणे बंद झाल्याने एका मित्राने श्रद्धाच्या भावाला फोन करुन सांगितले, त्यानंतर ही बाब भावाकडून वडिलांना समजली. वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मग पोलिसांनी तपास सुरु केला आणि ही घटना उघड झाली.