उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरमध्ये झालेल्या अपघाताबाबत अपघातात अनेक खुलासे झाले आहेत. बीएमडब्लू कारचा अपघात होऊन चौघांचा मृत्यू (Four Death in BMW Accident) झाला. भरधाव वेगातील बीएमडब्लू कार अनियंत्रित झाल्याने (Uncontrolled Car) हा अपघात घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अपघातावेळी बीएमडब्लूचा वेग ताशी 230 किमी होता. अपघात होण्यापूर्वी कारमधील चौघांनी फेसबुक लाईव्ह (Facebook Live) केले होते. यावेळी एक जण आज चौघेही मरणार असे बोलत आहे.
डॉ. आनंद कुमार, इंजीनिअर दीपक आनंद, अखिलेश सिंह आणि भोला कुशवाहा अशी अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. चौघे जण बीएमडब्लू कारने लखनौ येथे चालले होते. सदर कार भोला कुशवाहा चालवत होता.
कार चालवत असताना चौघे फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या मित्रांना भरधाव बीएमडब्लूचा रोमांचक प्रवास दाखवत होते. तसेच लाईव्हमध्ये चौघेही कारच्या स्पीडवर चर्चा करत आहेत.
फेसबुक लाईव्हमध्ये हे चौघे कारचा वेग आणखी वाढवण्यास बोलत आहेत. तसेच वेग वाढवत सीट बेल्ट लावण्यास सांगितले जात आहे. यादरम्यान भरधाव कार कंटनेवर धडकली आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. तसेच एका तरुणाचे सर्व अवयव वेगळे झाले, असे प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितले. मयत डॉक्टर आनंद कुमार आणि इंजिनिअर दीपक आनंद एकमेकांचे मेव्हणे होते. तर अन्य दोघे डॉक्टरचे मित्र होते.
डॉक्टर आनंद कुमार हे एनएमसीएचमध्ये लेप्रोसी विभागात एचओडी होते. त्यांना महागड्या कार आणि बाईकचा शोक होता. त्यांच्याकडे 16 लाखाची बाईक आणि सव्वा कोटीची बीएमडब्लू होती. बीएमडब्लूच्या सर्विसिंगसाठी ते त्यांचे मेहुणे आणि दोन मित्रांसह लखनौला जात होते.