Kirit Somiya Meet Arvind Vaishya Family : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता अरविंद वैश्य (26) यांच्या अंत्ययात्रेवर काल दगडफेक झाली होती. यानंतर धारावीत काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अरविंद वैश्य यांच्यावर धारावी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अरविंद वैश्य यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी अरविंद वैश्य यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतंच धारावीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता अरविंद वैश्य यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी वैश्य कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “सध्या वैश्य कुटुंबीय अत्यंत त्रस्त अवस्थेत आहे. त्यांचा 26 वर्षांचा मुलगा नोकरी करत होता. अचानक तो निघून गेला. त्यामुळे कुटुंबावर संकट कोसळले आहे. यामुळे वैश्य कुटुंबाने न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. तसेच आमचे पुनर्वसनही करा, अशीही मागणीही कुटुंबाने केली आहे. आम्ही त्यांना नक्कीच न्याय देऊ, असे किरीट सोमय्या म्हणाले.
अरविंद वैश्य यांच्या अंत्ययात्रेवर काल दगडफेक झाली. तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. हे लोकं अशाप्रकराची हिंमत कशी काय करु शकतात. पोलीस कमिशनर झोपले होते का? असा प्रश्नही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला.
“नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडावरही किरीट सोमय्या यांनी भाष्य केले. माझं पोलिसांना सांगणं आहे की सध्या जो काही जिहाद सुरु आहे, त्यावर आळा घाला. उद्धव ठाकरे हे जिहादवर गप्प का? उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पावर यांनी जिहादबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करावी”, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
“ड्रग्स माफिया आणि लव्ह जिहादवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष द्यावं. समाज याचा बदला घेईल. त्यापूर्वी लक्ष घाला. यशश्रीची पण हत्या यांनी केली. पोलिसांना आता कडक व्हावं लागेल. अति होत आहे, अंत पाहू नका. शिंदे यांना माझी विनंती आहे की तुम्ही हिंदूंचा अंत पाहू नका. उरणमध्ये अनेक साथीदार होते त्याचा पण शोध घ्यावा”, अशीही मागणी किरीट सोमय्या यांनी केली.