उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभ मेला 2025 आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पहिले शाही स्नान काल पौष पौर्णिमेला झाले. या पौर्णिमेला भक्तांची मांदियाळी जमली होती. या महाकुंभला जवळपास 40 कोटी भक्त आणि साधुसंताचा मेळावा भरला होता. या सोहळ्यात काही अफवा पसरविण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या महाकुंभमध्ये अकरा जणांचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
महाकुंभ २०२५ मध्ये या पौष पौर्णिमेला पहिले शाही स्नान झाले. या दरम्यान अकरा जणांचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची बातमी एकाने सोशल मीडियाने पोस्ट केली होती. या प्रकरणात खोटे वृत्त पसरवल्या प्रकरणात पोलीसांनी बलिया येथील एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण उघडकीस येण्यामागे एक सोमवारी एका तक्रारदार अवकुश कुमार सिंग याने या संदर्भातील माहिती एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन दिली आहे.
तक्रारदाराने सांगितले की आरोपी लालू यादव संजीव याने फेसबुक वर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये महाकुंभ स्नाना दरम्यान ११ भक्तांचा थंडीने गारठून हार्ट अटॅकने मृत्यू झाला असून आपात्कालिन वैद्यकीय कॅम्प रुग्णांना भरलेले आहेत असे या पोस्टमध्ये नमूद केले होते, त्यानंतर पोलिसांना या प्रकरणात तक्रारदाराच्या तक्रारीनंतर त्या युवकावर गु्न्हा दाखल केला आहे. ही पोस्ट संपू्र्ण खोटी आणि दिशाभूल करणारी होती. त्या सर्वसामान्य जनतेत भीती पसरवणे आणि सामाजिक शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली या तरुणावर गुन्हा दाखल केल्याचे पखडी पोलिस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफीसर राजेंद्र प्रसाद सिंह यांनी सांगितले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तरुणावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ (२) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) मोहम्मद फहीम कुरेशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपास केला जात असल्याचे कुरेशी यांनी स्पष्ट केले आहे. जनतेने सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरवू नयेत आणि कोणत्याही माहितीची सत्यता तपासावी असे आवाहन पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे.