मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला होता, त्या रात्री निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) तिथे काय करत होते? याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. मनसुखच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांची भेट वाझेंनी का घेतली होती? हा सवाल उपस्थित होत आहे. मनसुख हिरेन यांच्या पार्थिवावर ठाण्याच्या जवाहरबाग स्मशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. (Sachin Vaze allegedly met Doctor who performed Post mortem of Mansukh Hiren)
“मी सचिन वाझे” अशी ओळख करुन दिली
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होण्याआधी सचिन वाझेंनी संबंधित डॉक्टरांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. “मी सचिन वाझे” अशी ओळख करुन त्यांनी तिथल्या डॉक्टरांना करुन दिली होती.
मुंब्य्राच्या इन्स्पेक्टरशीही भेट
मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनाही वाझेंनी आपली ओळख दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सचिन वाझे तिथे का गेले होते? सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची भेट सचिन वाझेंनी का घेतली होती? या मुद्यावर आता एनआयए तपास करत आहे.
वाझेंच्या एनआयए कोठडीत वाढ
अँटालिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष कोर्टाने मोठा दणका दिला आहे. वाझेंच्या कोठीडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाझे यांना आणखी आठवडाभर तरी एनआयएच्या ताब्यात राहावं लागणार आहे. (Sachin Vaze allegedly met Doctor who performed Post mortem of Mansukh Hiren)
एनआयएची कोर्टाला धक्कादायक माहिती
सचिन वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. 30 पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र त्यापैकी 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचंही एनआयएने दोन दिवसांपूर्वी कोर्टाला सांगितलं होतं.
संबंधित बातम्या :
सचिन वाझेंना बळीचा बकरा कोणी बनवलं? NIA कोर्टात मोठं विधान
(Sachin Vaze allegedly met Doctor who performed Post mortem of Mansukh Hiren)