मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे (Sachin Waze) यांचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळण्याच्या आदल्या दिवशी वाझे सीएसएमटी रेल्वे स्टेशनकडे जाताना या व्हिडीओत दिसत आहेत. (Sachin Vaze Spotted in CCTV at CSMT Railway Station day before Mansukh Hiren found dead)
4 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजून 1 मिनिटांचा हा सीसीटीव्ही व्हिडीओ आहे. पाच मार्चला मनसुख यांचा मृतदेह कळवा रेतीबंदर परिसरात सापडला होता. त्याच्या आदल्या दिवशीचा हा सीसीटीव्ही आहे. वाझे संध्याकाळी सातच्या सुमारास सीएसएमटीवरुन लोकल ट्रेन पकडून ठाणे स्टेशनला गेल्याची माहिती आहे.
सचिन वाझेंसह नाट्य रुपांतरण
दरम्यान, सचिन वाझे यांना घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील लोकल ट्रेनने (Local Train) प्रवास केला. 4 मार्च रोजीच्या घटनांचे नाट्य रुपांतरण करण्यासाठी सचिन वाझे यांना छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) आणि कळवा रेल्वे स्थानकात नेण्यात आले होते.
रात्री साधारण सव्वाअकराच्या सुमारास NIA चे अधिकारी वाझे यांना घेऊन मुंबईतील कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर साडेअकरा वाजता हे सर्वजण सीएसएमटी स्थानकात दाखल झाले. याठिकाणी फलाट क्रमांक 4 आणि 5 वर सचिन वाझे यांना नेऊन 4 मार्चच्या रात्री काय घडले होते, याची नेमकी माहिती ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
पाहा व्हिडीओ :
(Sachin Vaze Spotted in CCTV at CSMT )
कसे केले नाट्य रुपांतरण
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साचिन वाझे यांनी 4 मार्च रोजी CSMT ते कळवा हा प्रवास लोकल ट्रेनने केला होता. त्यामुळे रात्री 12.15 च्या लोकल ट्रेनने NIA ची टीम सचिन वाझे यांना घेऊन कळव्याच्या दिशेने निघाली. साधारण 12.45 च्या सुमारास लोकल ट्रेन कळव्याला पोहोचली. याठिकाणी उतरल्यानंतर NIAच्या अधिकाऱ्यांनी 30 मिनिटं थांबून 4 मार्चच्या रात्री घडलेल्या घटनांचे नाट्यरुपांतरण (क्राईम सीन रिक्रिएट) केले. हे सगळं आटोपल्यानंतर NIAची टीम रात्री सव्वाच्या सुमारास सचिन वाझे यांना घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. रात्री दोन वाजता हे सर्वजण पुन्हा मुंबई NIAच्या कार्यालयात पोहोचले.
अँटिलियाबाहेरही सीन रिक्रिएट
याआधीही उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर घडलेल्या घटनांचे एनआयएकडून नाट्य रुपांतरण करण्यात आले होते. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालायला लावले होते. एनआयए आणि फॉरेन्सिक टीमने अँटिलिया परिसर ब्लॉक करुन सीन रिक्रिएट केला होता.
संबंधित बातम्या :
VIDEO | अंधुक दिवे, रस्त्यावर खुणा, कुर्ता घातलेले सचिन वाझे, NIA ने कसे केले नाट्य रुपांतरण?
सचिन वाझेंना घेऊन NIA टीमचा लोकल ट्रेनने प्रवास; CSMT आणि कळवा स्थानकात क्राईम सीन रिक्रिएट
(Sachin Vaze Spotted in CCTV at CSMT Railway Station day before Mansukh Hiren found dead)