केअर टेकर ठेवताय तर सावधान! गोड गोड बोलून मालकिणीचा विश्वास संपादन केला, सुट्टीवर गेल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

| Updated on: May 09, 2023 | 7:49 PM

जेष्ठ महिलेची काळजी घेण्यासाठी घरच्यांनी एक केअरटेकर ठेवली होती. मात्र या केअरटेकरने मालकिणीची काळजी घेता घेता भलतंच केलं.

केअर टेकर ठेवताय तर सावधान! गोड गोड बोलून मालकिणीचा विश्वास संपादन केला, सुट्टीवर गेल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार
मालकिणीचे दागिने चोरणाऱ्या केअरटेकरला अटक
Image Credit source: TV9
Follow us on

गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई : जेष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी केअरटेकरचा पर्याय अवलंबला जातो. मात्र या केअरटेकरकडून गुन्हेगारीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशी एक घटना कांदिवलीत उघडकीस आली आहे. केअरटेकरनेच वृद्ध मालकिणीला गंडा घातल्याची घटना कांदिवलीत घडली आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी बोरीवली येथील एका 26 वर्षीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी महिलेकडून 12 लाख 50 हजारांचे चोरीचे दागिने जप्त केले आहेत. या घटनेमुळे जेष्ठ नागरिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

केअरटेकरने संधी साधत दागिने चोरले आणि गायब झाली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली अशोक नगर येथील भूमी आर्केड इमारतीत 71 वर्षीय महिलेची काळजी घेण्यासाठी 26 वर्षीय महिला केअरटेकर नेमण्यात आली होती. संधी पाहून केअरटेकर महिलेने घरात ठेवलेल्या दागिन्यांवर हात साफ केला. दागिने चोरी केल्यानंतर गावात लग्नाच्या बहाण्याने सुटी घेऊन गायब झाली. यानंतर काही दिवसांनी मालकिणीने कपाट उघडले असता लॉकरमधील दागिने गायब असल्याचे दिसले.

आरोपी महिलेला पोलिसांकडून अटक

मालकिणीने समता नगर पोलिसात धाव घेत चोरीच्या तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान चोर दुसरं तिसरं कुणी नसून, वृद्ध महिलेची काळजी घेण्यासाठी घरात ठेवलेली 26 वर्षीय केअरटेकर असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपी महिलेला बोरिवली येथून अटक केली असून, तिच्याकडून 12 लाख 50 हजारांचे दागिने जप्त केले आहेत.

हे सुद्धा वाचा