शंकर देवकुळे , सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा (sangali shirala) तालुक्यातील निगडी (nigadi) गावात मागील महिन्यात सशस्त्र दरोडा टाकला होता. घरातील महिलेच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढताना महिलेच्या डोक्यात मारहाण जब्बर मारहाण केली होती. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्या गुन्ह्याचा छडा (Crime News) लावला असून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. दरोडा पाच जणांच्या टोळीने घातला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली. दरोड्यात चोरलेले ३ लाख ७० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मगऱ्या अशोक ऊर्फ अजीतबाबा काळे (येवलेवाडी, ता. वाळवा), तक्षद ऊर्फ स्वप्नील पप्या काळे (कार्वे ता. वाळवा ) आणि गोपी ऊर्फ टावटाव त्रिशुल ऊर्फ तिरश्या काळे (ऐतवडे खु. ता. वाळवा) यांचा समावेश आहे. दरम्यान दरोड्याच्या घटनेत सदाशिव दादू साळुंखे आणि हिराबाई सदाशिव साळुंखे हे वृध्द दांपत्य गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना हिराबाई साळुंखे यांचा मृत्यू झाला.
निगडी गावचे शिवारात वस्तीवर सदाशिव दादु सांळुखे व हिराबाई सदाशिव साळुंखे हे वयोवृद्ध दांपत्य राहत होते. 17 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरामध्ये असलेल्या झोपेत हिराबाई साळुंखे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला दोघांनी विरोध केल्याने हल्लेखोरांनी सदाशिव व हिराबाई यांना कोणत्यातरी हत्याराने डोक्यात गंभीर मारहाण केली. त्यानंतर काही वेळात ते तेथून पसार झाले. दरम्यान जखमी हिराबाई यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस पथके जिल्ह्यासह अन्य ठिकाणी पाठविण्यात आली होती.