सांगली : मिरज (Sangli Crime News) तालुक्यातील म्हैसाळमध्ये वनमोरे कुटुंबीयांना सामूहिक आत्महत्या केली. या आत्महत्येमागचं प्रमुख कारण जे समोर आलंय, ते अधिकच धास्तावणार आहे. राईस पुलिंगच्या नादात वनमोरे (Sangli Suicide News) बंधू कर्ज घेत गेले. अनेकांकडून त्यांनी पैसे उचलले. पण या राईल पुलिंगच्या नादाचा फटका त्यांना बसला. कर्जात बुडालेल्या वनमोरे बंधूंनी अखेर आपल्या अख्ख्या कुटुंबासह आत्महत्या केली आणि आपलं आयुष्य संपवलं. या सगळ्यांनी अखेर विष घेत आत्महत्या केली. सामूहिक आत्महत्या प्रकऱणी आतापर्यंत 13 जणांना पोलिसांनी अटक केलीय. तर 25 जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशीही सुरु केलीय. राईस पुलिंगच्या नाद वनमोरे बंधूंना लागला होता, अशी माहिती गावातल्या लोकांनी दिली आहे. राईस पुलर (Rice Puller) म्हणजेच तांदळाला खेचून घेणाऱ्या एका धातूबाबतच्या सौद्याबाबत वनमोरे बंधू नेहमी सांगायचे. वनमोरे बंधूंना एका विदेशी कंपनीकडून तीन हजार कोटी रुपये मिळणार होते, असंही सांगितलं होतं. अर्थात, याला अधिकृत दुजोरा अद्याप मिळू शकलेला नाही. मात्र पोलिसांकडून या सर्व माहितीच्या आधारे तपास केला जातोय.
राईस पुलिंगच्या एका सौदा वनमोरे बंधूंनी केला होता, असं सांगितलं जातं. एका टोळीनं त्यांना याबाबत फूस लावली होती. त्यांच्या आमिषाला बळी पडून या दोघांनी अनेकांकडून उसणे पैसे घेतले होते. राईस पुलिंगमुळे फायदा होईल, पैसे रातोरात दुप्पट होईल, भरभराट होईल, असं वनमोरे बंधूंना सांगण्यात आलं होतं. श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिलेल्या वनमोरे बंधूंनी राईल पुलिंग मशिनच्या नादात इतकं कर्ज घेऊन ठेवलं की त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राईस पुलिंगच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला जातो. याआधीही असे अनेक प्रकार उघडकीस आलेत.
राईस म्हणजे तांदूळ आणि पुलर म्हणजे ओढणं! राईस पुलर म्हणजे एक असा धातू, वस्तू किंवा भांड जे मौल्यवास असल्याचा दावा केला जातो. राईल पुलरच्या मदतीनं उपग्र आणि अवकाशात उर्जा निर्माण केी जाते. याची किंमत कोट्यवधी रुपये असून नासासारख्या संस्था याचा उपयोग करतात. अनेकजण लालसेपोटी कोट्यवधी रुपये खर्चून राईस पुलर विकत घेतात. व्यवसायात वृद्धी होईल, पैसे दुप्पट होतील, संपत्ती वाढेल, या विचाराने अनेकजण भुलथापांना बळी पडतात आणि राईस पुलिंगच्या नावाखाली पैसे लाटले जाण्याचे प्रकार घडतात.
आत्महत्या केलेल्या दोघा भावाच्या खिश्यात दोन चिठ्या सापडल्या आहेत. त्यामध्ये अनेकांची नावे आहेत. त्यांनी सावकारी कर्ज घेतलं होतं. व्यापारसाठी कर्ज घेतले होतं, असे चिट्ठी मध्ये नमूद आहे. कोल्हापूरचे आयजी मनोजकुमार लोहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भावाला एका बँकेकडून वसुलीच्या नोटीसाही मिळालेल्या होत्या. अखेर आर्थिक नैराश्यातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. आता या सगळ्या माहितीच्या आधारे अधिक तपास केला जातोय.
आज कुणीच दूध घेण्यासाठी घरी आलं नाही, म्हणून माणिक वनमोरे यांच्या घरी एक मुलही गेली होती. घरात तिनं जे चित्र पाहिलं, त्यानं ती हादरली. तिनं याबाबतची माहिती शेजाऱ्यांना दिली. गावातील लोकांना याबाबत कानोकान खबर लागली. त्यानंत हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. खरंतर पोपट वनमोरे यांची एक मुलगी बँकेत कामाला होती. ती आणि तिची आजी रविवारीच घरी आलेल्या. दरम्यान, दोघा भावांपैकी पोपट वनमोरे यांचा आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह एका ठिकाणी घरात आढळला. तर दीड किलोमीटर अंतरावर त्यांचा भाऊ माणिक वनमोरे, त्यांची पत्नी, मुलगी, मुलगी आणि पुतण्या यांच्यासह आईचाही मृतदेह आढळून आला होता.