सांगली – चार दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या दोघा चिमुरड्या बहिण भावाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळल्याने गावात मोठी खळबळ माजली आहे. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असणारे जतच्या अमृतवाडी (Amrutwadi) येथील दोघा बहीण-भावांचे मृतदेह (Dead bodies) विहिरीमध्ये सापडल्याने सगळ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. एका शेतमजुराची ही दोन मुलं चार दिवसांपासून बेपत्ता होती.अखेर त्यांचे मृतदेह एका विहिरीत आढळून आले आहेत. सुलोचना गवळी (वय 5) आणि इंद्रजीत गवळी (वय 3) अशी या चिमुरड्यांची नावे आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (jat police) सगळ्या गोष्टीची नोंद केली आहे, त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास करणार असल्याची माहिती दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा येथील आनंद गवळी व त्यांच्या पत्नी हे दोघेजण जत तालुक्यातल्या अमृतवाडी येथील बागायतदार शेतकरी दीपक हत्ती यांच्याकडे कामाला आहेत. चार दिवसांपूर्वी आनंद गवळी यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी आनंद गवळी यांनी पत्नीला जत या ठिकाणी उपचारासाठी घेऊन गेले. त्याचवेळी त्यांची चार मुलं घरात होती.
सायंकाळी परत आल्यानंतर त्यांची दोन मुलं झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. तर सुलोचना व इंद्रजित ही मुलं ही दिसत नसल्याचे आईवडिलांच्या लक्षात आलं. त्यानंतर दोघा बहीण-भावांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावात आणि जत पोलीस पोलिसांच्याकडून देखील या मुलांचा शोध घेण्यात येत होता.
मुलं सापडत नसल्याने अपहरणाची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. घराजवळ असणाऱ्या एका विहिरीमध्ये ही मुलं पडल्याचा संशय आल्याने, त्या ठिकाणी देखील शोध मोहीम राबवण्यात आली होती, मात्र त्या विहिरीत मुलं आढळून आली नव्हती. सर्वत्र शोध मोहीम राबवून देखील मुलं सापडून येत नसल्याने नेमकं या मुलांचं काय झालं ? ही मुलं कुठे बेपत्ता झाली,असा प्रश्न सगळ्यांनाचं पडला होता.
रविवारी दुपारी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या विहिरीमध्ये दुपारी ही दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगत असल्याचं आढळून आली आहेत. याबाबत अधिक तपास आता जत पोलीस करत आहेत.