सांगली : सांगली (Sangli crime) जिल्ह्यातील इस्लापपूर पोलिसांनी (Islampur Crime News) मोठी कारवाई केली. बनावट नोटा छापून (Fake notes) त्या वापरात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. लाखो रुपयांच्या नोटांची छपाई करुन या टोळीने खोट्या नोटा चलनात आणल्या होत्या. इतकंच काय तर एका प्रतिष्ठीत बँकेच्या एटीएममध्ये देखील या बनावट नोट्या भरल्या गेल्या होत्या. खोट्या नोटांची छपाई करणाऱ्या या टोळीच्या मुख्य संशयित आरोपीच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी लाखो रुपयांच्या खोट्या नोटा आणि छपाईच्या साहित्यावरही कारवाई केली आहे.
इस्लामपुरातील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत पैसे भरण्यासाठीच्या डिपॉझिट मशीनमध्ये टोळीकडून पैसे भरले जात होते. या डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा भरल्या जात होत्या. याप्रकरणी इस्लमापूर पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीच्या सांगलीतील घरावर छापा टाकला आणि या टोळीचा भांडाफोड केलाय. पोलिसांनी टाकलेल्या छापेमारीमध्ये 7.66 लाख रुपयांच्य बनावट नोटा जप्त केल्या आहेत. फक्त नोटाच नव्हे तर छपाईसाठी वापरण्यात येत असलेलं साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कारवाईमध्ये बनावट नोटांचा छपाई कारखानाच पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय.
एकूण चार जणांना पोलिसांनी बनावट नोटांच्या छपाई आणि वापराप्रकरणी अटक केली आहे. इस्लामपूर पोलिसांकडून या सर्वांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या टोळीचे अनेक बँकेतील बड्या अधिकाऱ्यांसोबतही संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
सांगलीतल्याच एका एचडीएफसी बँकेतील अधिकाऱ्यानं बनावट नोट डिपॉझिट मशिनीत भरल्या होत्या. संग्राम सदाशिव सूर्यवंशी असं या बँक अधिकाऱ्याचं नाव असून या अधिकाऱ्यानं पाचशे रुपयांच्या सहा खोट्या नोटा बनावट असल्याचं माहीत असूनही डिपॉझिट मशिनमध्ये भरल्या होत्या.
आरबीआयकडून पाचशे रुपयांची खरी नोट कोणती आणि खोटी नोट कोणती, हे ओळण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. पाचशेची नोट सरळ पाहिल्यानंतर त्यात देवनागरी भाषेत पाचशे रुपयांचा आकडा लिहिलेला दिसतो. शिवाय मध्यभागी गांधीजींचं चित्रंदेखील दिसून येतं. तसंच सूक्ष्म अक्षरामध्ये भारत आणि इंडिया असं लिहिलेलं दिसून येतं. दरम्यान, एक सिक्युरिटी थ्रेडही इथंच दिसतो. या सिक्युरेटी थ्रेडचा रंग हिरवा असल्याचं दिसून येतं. या सगळ्या बाबींची पूर्तता असेल, तर ती नोट खरी आहे, असं म्हणता येतं.