सांगलीच्या (Sangli News) जतमधील एक कुटुंब ओमान देशातील समुद्रात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी घडली. एकाच कुटुबांतील तिघांचा या घटनेत मृत्यू झाला. ही घटना 10 जुलै घडल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण सांगलीत (Sangli crime News) हळहळ व्यक्त केली जाते आहे. या दुर्घटनेमध्ये सांगलीतील असलेल्या शशिकांत म्हणाणे (Family drowned in Oman Sea) यांच्यासह त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रुती आणि सहा वर्षांचा मुलगा श्रेयस यांचा मृत्यू झाला आहे. या वृत्तला शशिकांत म्हणाणे यांचे बंधू वकील राजकुमार म्हणाणे यांनीही दुजोरा दिलाय. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुटुंब वाहून जातानाही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. मात्र हा व्हिडीओ कितपत खरा आहे, याची पडताळणी होऊ शकलेली नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून शशिकांत म्हणाणे हे दुबईत होते. मूळचे जतमधील हे कुटुंब दुबईत वास्तव्यास होतं. एका कंपनीत सेल्स मॅनेजर पदावर शशिकांत काम करत होते. आपल्या कुटुंबासह ते ओमान येथील समुद्रावर गेले होते. वर्षा सहलीसाठी कुटुंबसमवेत गेले असता ही दुर्घटना घडली.
सांगलीतील निवृत्त शिक्षक सिद्राम म्हमाणे यांच्या तीन मुलांपैकी एक असलेले शशिकांत हे दुबईत नोकरी करत होते. ते गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून दुबईतच वास्तव्यास होते. धक्कादायक बाब म्हणजे शशिकांत यांची पत्नी सारिका म्हणाणे यांच्या समोरच ही घटना घडल्यानं त्यांच्यावरही मोठा आघात झालाय. म्हमाणे कुटुंबीयांवर या घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळलाय.
हा व्हिडीओ व्हायरल आहे. ओमानचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय. ओमानच्या समुद्रात तिघा भारतीयांचा महत्त्वाचं म्हणजे आपल्या सांगलीतल्या तिघांचा बुडून मृत्यू झालाय. या व्हिडीओचा आणि त्या घटनेचा एकमेकांशी खरंच संबंध आहे का? माहीत नाही. पण घटना अंगावर काटा आणणारीच.. #Sangli #Video pic.twitter.com/47XgD6mUaz
— Siddhesh Sawant (@ssidsawant) July 13, 2022
अचानक समुद्राला भरती आली. एका तडाखेबंद लाटेचा अंदाज आला नाही आणि दोघे जण वाहून गेल्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ओमान येथील स्थानिक वृत्त संस्थानीही याबाबतचा एक व्हिडीओ जारी केला आहे. दरम्यान व्हिडीओमध्ये आठ जणं वाहून गेल्याचा दावा करण्यात आला आहे. ओमानच्या सालाह अल मुघसैल समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या तडाख्यात आठ भारतीय समुद्रात पडले. सुरक्षा रेषेच्या पुढे गेलेल्यांना समुद्राच्या लाटेनं आपल्या कवेत घेतलं. तर तिघांना वाचवण्यात यश आलं. तर इतरांसाठी नंतर शोधकार्य सुरु असल्याचंही सांगितलं गेलंय.