स्वत:ची गाडी सांगून चोरीची गाडी विकण्याचा प्रयत्न फसला, साडेचार लाखांच्या गाड्या जप्त, पोलिसांची मोठी कामगिरी

| Updated on: Jun 15, 2021 | 4:36 PM

आधी दुचाकी गाड्यांची चोरी केली. त्यानंतर त्या गाड्यांची विक्री करणाऱ्या एका चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात सांगलीच्या जत पोलिसांना यश आलं आहे (Sangli Jat Police arrest bike thief).

स्वत:ची गाडी सांगून चोरीची गाडी विकण्याचा प्रयत्न फसला, साडेचार लाखांच्या गाड्या जप्त, पोलिसांची मोठी कामगिरी
स्वत:ची गाडी सांगून चोरीची गाडी विकण्याचा प्रयत्न फसला
Follow us on

सांगली : आधी दुचाकी गाड्यांची चोरी केली. त्यानंतर त्या गाड्यांची विक्री करणाऱ्या एका चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात सांगलीच्या जत पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे या आरोपीने पाच दुचाकींची चोरी केल्याचं कबूल केलं आहे. तसेच त्याच्या इतर साथीदारांनी देखील दुचाकींची चोरी केली आहे. त्यांचा शोध सध्या जत पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे एक आरोपी सापडल्याने त्याचे इतर साथीदारही लवकरच सापडतील, असा पोलिसांना विश्वास आहे (Sangli Jat Police arrest bike thief).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

जत पोलिसांनी अटक केलेल्या दुचाकी चोराचं नाव विशाल विठ्ठल बामणे (वय 24) असं असल्याचं समोर आलं आहे. त्याने आतापर्यंत पाच दुचाकींची चोरी केली, अशी माहिती कबुली जबाबात दिली आहे. तो चोरलेल्या गाडी विकण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांना खात्रीलायक सूत्रांकडून त्याच्याविषयी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला विशालनगर येथे गाठलं. त्याला अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी केली. या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेल्या जवळपास 4 लाख 50 हजार किंमतीच्या सर्व गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे (Sangli Jat Police arrest bike thief).

कागदपत्रे तपासूनच गाडी खरेदी करा, पोलिसांचे आवाहन

आरोपीच्या साथीदारांनी आणखी दोन गाड्या चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. ते लवकरच सापडतील अशी आशा आहे. पण नागरिकांनी कोणतीही दुचाकी किंवा चारचाकी गाडी खरेदी करताना त्या वाहनाचा आधी झालेला व्यवहार, गाडी मालकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, इतर सर्व कायदेशीर कागदपत्रे तपासूनच गाडी खरेदी करावी, असं आवाहन जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी केलं आहे. दरम्यान, या चोरीच्या घटनेचा पोलीस नाईक प्रवीण (बाबू) पाटील, केरबा चव्हाण, सतीश माने, संतोष कुंभार यांनी छडा लावला.

पुणे ग्रामीण पोलिसांनीदेखील दुचाकी चोरट्यांना पकडलं

सांगलीच्या जत पोलिसांसारखंच पुणे ग्रामीण पोलिसांनीदेखील दोन दिवसांपूर्वी दुचाकी चोरट्यांविरोधात मोठी कारवाई केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 11 दुचाकी जप्त केल्या तर एकाला अटक केली. या गाड्यांची किंमत  4 लाख 10 हजार इतकी होती. तसेच या कारवाईतून आठ गुन्हे उघड झाले.

हेही वाचा :

ईडीनं छापा टाकलेल्या अविनाश भोसलेंची मोठी गुंतवणूक; दक्षिण मुंबईत डुप्लेक्स फ्लॅटची खरेदी, किंमत किती?

कामधंदे नाही, नवनव्या गाड्या फिरवून शायनिंग मारायचे, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड