सांगली: जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवरुन धक्कादायक घटना घडली आहे. बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून एका ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. यानिमित्तान ग्रामपंचयात निवडणुकांमधील गावपातळीवरील राजकारण कोणत्या थरापर्यंत पोहोचलं आहे हे पाहायला मिळते. पांडुरंग काळे असं मृत ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे. (Sangli Kawathemahankal Borgaon Gram Panchayat Election Pandurang Kale murder )
बोरगाव गावातील पांडुरंग काळे (वय 55) या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. पांडुरंग काळे हे भाजपचे सदस्य होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी खून केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. बोरगावमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पांडुरंग काळे यांचा खून झाला असून या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेप्रकरणी चौकशीला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आहे. पांडुरंग काळे यांच्या खून प्रकरणामुळे गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये होणारं राजकारण कोणत्या पातळीवर पोहोचलंय हे बघायला मिळते. उपसरपंच निवडीवरुन ही घटना घडल्याची माहिती आहे.
पांडुरंग काळे यांचा उपसरपंचपदाच्या निवडीच्या वादातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य जखमी असल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.स्वतः जिल्हा पोलिस प्रमुख घटनास्थळी दाखल झालेले आहेत.कांही कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे अधिक तपास सुरू आहे
पोलीसांनी कपडे काढायला लावले की ‘झगा’ काढून महिला उभी? जळगाव प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? वाचा सविस्तर https://t.co/bG0EYOuoXb #Jalgaon | #WomenHostel | #AnilDeshmukh
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021
संबंधित बातम्या
राष्ट्रवादीचा भाजपला पहिला झटका, नेते कल्याण काळे घड्याळ बांधणार?
जेपी नड्डांवरील हल्ल्याचे पडसाद, भाजपचा मुंबईत रास्तारोको; राज्यभर आंदोलनाचा इशारा
Video : अंकिता लोखंडेचा आणखी एक डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल
सोलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा दगडावर डोकं आपटून खून, आरोपीला बारा तासात अटक
(Sangli Kawathemahankal Borgaon Gram Panchayat Election Pandurang Kale murder)