सांगली : मिरज (Miraj) तालुक्यातील बेडगमध्ये रात्री जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावाकडून भावाचा खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर परिसरात लोकांची गर्दी वाढली. कुऱ्हाडीने मानेवर वार केल्यामुळे चुलत भावाचा जागीचं मृत्यू झाला. आरोपीस तात्काळ अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी (sangli police) दिली आहे, त्याचबरोबर पोलिसांनी कुऱ्हाड सुध्दा ताब्यात घेतली आहे. ही घटना रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. घटनास्थळी पोलिसांनी (sangli crime news in marathi) बंदोबस्त ठेवला आहे.
बंडू शंकर खरात (वय ५०) असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सचिन बबन खरात (वय 30 रा खरात वस्ती बेडग) असं आरोपीचं नाव आहे. दोन एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. मागच्या कित्येक वर्षांपासून दोघांच्यात जमिनीचा वाद सुरु होता अशी चर्चा परिसरात आहे.
रात्री आठ ते नऊच्या दरम्यान सचिन बबन खरात याने कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृण खून केला. खुनानंतर आरोपी सचिन बबन खरात (वय 30 रा खरात वस्ती बेडग) याला लगेचं पोलिसांनी अटक केली आहे. मल्लेवाडी रस्त्यावर खरात वस्ती येथे ही घटना घडली आहे. खरात यांच्या मानेवर, तोंडावर, पाठीवर जोरदार हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले आहेत. या खुनात वापरलेली कुऱ्हाडही पोलिसांनी जप्त केली आहे. बंडू खरात यांचा चुलत भाऊ सचिन खरात यांच्याशी जमिनीचा वाद सुरू होता. सोमवारी रात्री वाद विकोपाला गेला, त्यानंतर संतप्त झालेल्या सचिन बबन खरात याने हल्ला केला.
मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही घरातील लोकांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.