सांगली : लग्न झाल्यानंतर निराश झालेल्या एका विवाहित तरुणीनं आत्महत्या (Suicide) केली. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीनं आपल्या प्रियकरासोबत विषारी औषधाचं (poison)सेवन करत दोघांनीही आपलं आयुष्य संपवलंय. संपूर्ण सांगली (sangli) जिल्ह्यामध्ये या घटनेनं खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. जत तालुक्यातील एकुंडी परिसरा या घटनेनं हादरुन गेला आहे. विशेष म्हणजे अवघे काही दिवस अगोदर या तरुणीचा विवाह झाला होता. त्यानंतर ही तरुणी नुकतीच माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर या तरुणीनं आपल्या प्रियकराला फोन केला. लग्न झाल्यानं आता आपण एकत्र कसे येणार? या विवंचनेत असताना दोघांनीही जीव दिलाय. या घटनेनं दोघांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.
आत्महत्या करणाऱ्या विवाहीत तरुणीचं नाव अश्विनी गजानन माळी असून मृत तरुणाचं नाव लक्ष्मण संभाजी शिंदे असं आहे. या तरुण प्रेमी युगुलाच्या आत्महत्येनं शिंदे आणि माळी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अश्विनी 22 वर्षांची होती, तर लक्ष्मणचं वय 21 होतं. दोघांनीही आपआपल्या घरी विष घेत आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जत पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मयत अश्विनी हिचा विवाह एक जूनला झाला होता. अश्विनी माळी ही मूळची सरगरे येथील असून सध्या ती एकुंडी येथे राहण्यास आहे. एकुंडी येथीलच लक्ष्मण शिंदे याच्याबरोबर अश्विनी हिचे प्रेम संबंध होते. अश्विनी हिचे एक जूनला लग्न झाले. मिरज येथून अश्विनी ही एकुंडी येथे दोन दिवसापूर्वी आली होती. सोमवारी दुपारी अश्विनी व लक्ष्मण यांनी मिळून विषारी औषधाचं सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अश्विनी आणि लक्ष्मणला अस्वस्थ वाटत असल्यानं त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली असून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय.
अश्विनी ही सहा दिवसांपूर्वी माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर लक्ष्मण बरोबर फोन वर चर्चा करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय.