सांगली: जिल्ह्यातील विटा नगरपालिकेने सुरू केलेल्या जीवनधारा कोविड हॉस्पिटलला तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी जोरदार झटका दिला आहे. कोरोना रुग्णांकडून जास्त आकारण्यात आलेले 11 लाख 84 हजार रूपये रूग्णांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. (Sangli Vita Magistrate order to Jeevandhara Hospital refund eleven lakh rupees to patient)
विटा नगरपालिकेने चालू केलेल्या जीवनधारा कोविड हॉस्पिटलमध्ये अव्वाच्यासव्वा बील आकारणी केली जात असल्याच्या लोकांच्या तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने रूग्णांच्या बिलाचे ऑडीट केले असता जीवनधारा रूग्णालयात लोकांच्याकडून भरमसाठ बील उकळले जात असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. सदरचा गंभीर प्रकार लक्षात येताच विट्याचे तहसिलदार ऋषिकेत शेळके यांनी अतिरिक्त आकारणी केलेले बील रूग्णांना परत करण्याचे आदेश रूग्णालयास दिले आहेत.
तब्बल 11 लाख 84 हजार इतके अतिरिक्त बील रूग्णांच्याकडून उकळण्यात आले होते. सदरचे रूग्णालय सुरू करताना विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मोठ्या थाटात रूग्णांना पंधरा टक्के सुट देण्याची घोषणा केली होती. पण वास्तवात मात्र रूग्णांना सुट देण्याऐवजी रूग्णांची लुट करण्याचा कार्यक्रम तिथे राबवला गेला असल्याचे दिसून आले. पंधरा टक्के सुट देण्याऐवजी दुप्पट दर आकारला जात होता.
माजी नगराध्यक्षांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पंधरा टक्के सवलतीचा विचार केला असता, जनरल वार्डला तीन हजार चारशे रूपये बील घेणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र सात हजार पाचशे रूपये बील घेतले जात होते. म्हणजे दुप्पट दर आकारला जात होता. जनरल वार्डला शासकीय दर 4000 इतका असताना जीवनधारा कोविड हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागाचा दर लावून बिल आकारले जात होते. या रूग्णालयात अतिदक्षता विभागच अस्तित्वात नाही तरीही रूग्णांच्याकडून अतिदक्षता विभागाचा दर आकारला जात होता.
शासनाच्या नियमाप्रमाणे जनरल ऑक्सिजन बेडला 4000, अति दक्षता विभागाला 7500 आणि व्हेंटीलेटरला 9000 असा दर ठरवून दिला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर लावून जीवनधारा रूग्णालयात लोकांची लुट सुरू असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने या लुटीस चाप लावला आहे.
विटा नगरपालिकेने चालू केलेल्या जीवनधारा कोविड हॉस्पिटलमध्ये अव्वाच्यासव्वा बील आकारणी केली जात असल्याच्या लोकांच्या तक्रारी होत्या. त्यानुसार तपासणी केल्यास जीवनाधारा रुग्णालयानं अतिरिक्त बील आकारल्याचं लक्षात आलं. त्यानुसार रुग्णांना रक्कम परत देण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णांना पैसे चेकद्वारे देण्याचे आदेश दिल्याची माहिती तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिली.
Video: रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू, ॲम्ब्युलन्स चालकांची सायरन वाजवून श्रद्धांजली, 15-20 रुग्णवाहिका स्मशानभूमीतhttps://t.co/Dd29u6lK5N#Amaravati | #Mahrashtra | #Corona | #AmbulanceMarch
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021
संबंधित बातम्या:
मृत्यूनंतरही कोरोना रुग्णावर 3 दिवस उपचार, पैसे उकळण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयाची बदमाशी
(Sangli Vita Magistrate order to Jeevandhara Hospital refund eleven lakh rupees to patient)