संजय राऊत लवकरच बाहेर येणार, भेटीदरम्यान काय घडलं एकनाथ खडसेंनी सांगितलं…

| Updated on: Oct 18, 2022 | 2:29 PM

पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती, त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी होती.

संजय राऊत लवकरच बाहेर येणार, भेटीदरम्यान काय घडलं एकनाथ खडसेंनी सांगितलं...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज भेट झालीय. न्यायालयाच्या कामकाजाकरिता खडसे हे आज मुंबईत होते. त्याच दरम्यान एकनाथ खडसे यांनी बाहेर आल्यावर माध्यमांशी बोलत असतांना संजय राऊत यांच्याशी बोलणं झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या जामीनाच्या सुनावणीनंतर लिफ्ट जवळ संजय राऊत यांची आणि माझी भेट झाल्याची माहिती खडसे यांनी दिली. संजय राऊत खोके नाही म्हणाले पण चिंता करू नका सगळं ओके आहे म्हणाले. काळजी करू नका मी लवकरच बाहेर येईल असेही राऊत म्हणाल्याचे खडसे यांनी सांगितले आहे. 21 ऑक्टोबरला संजय राऊत यांची पुढील सुनावणी होणार आहे.

पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती, त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी होती.

आज जिल्हा सत्र न्यायालयात खासदार संजय राऊतांना आणण्यात आले होते, त्याच दरम्यान लिफ्ट जवळ संजय राऊत आलेले असतांना एकनाथ खडसे यांची भेट झाली आहे.

एकनाथ खडसे हे देखील न्यायालयाच्या कामकाजाकरिता जिल्हा सत्र न्यायालयात आलेले होते, त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली.

एकनाथ खडसे यांनी यावेळी बाहेर असेलेल्या माध्यम प्रतिनिधींना भेटीत संजय राऊत काय बोलले ही माहिती दिली आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले चिंता करू नका सगळं ओके आहे, मी लवकरच बाहेर येईल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

ईडीच्या अटकेत असलेले संजय राऊत हे जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात प्रयत्न करीत आहे. त्याच दरम्यान एकनाथ खडसे यांची भेट झाली आहे.