सातारा : सातारा (Satara City) शहरात रात्री पिस्तूलचा धाक दाखवून कपड्याच्या दुकानातून दीड लाख लुटल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. अजंठा चौकात ही घटना घडली असून साताऱ्यातील व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुकान बंद करण्याची तयारी सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी दुकानात प्रवेश करून दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. त्यानंतर गल्ल्यातील सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे रहिमतपूर रस्त्याच्या दिशेने पसार झाले आहेत. सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळातच पोलीस अधीक्षक समीर शेख (Superintendent of Police Sameer Sheikh) यांनी देखील स्वतः भेट दिली. त्याचबरोबर घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली, रात्री सातारा (Satara Police) शहराबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती.
काल रात्री घडलेल्या घटनेमुळे पोलिस सुध्दा चांगलेचं जागृत झाले आहेत. काही मिनिटात इतका मोठा प्रकार घडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर काहीवेळ घबराहटीचे वातावरण होते. विशेष म्हणजे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासायला सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी भेट दिली, त्याचबरोबर लवकरचं आरोपींना आम्ही ताब्यात घेऊ असं आश्वासन दुकानदाराला दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक तयार केलं असून चोरट्यांचा शोध सुरु आहे.
पिस्तुल दाखवल्यामुळे कपड्याच्या खळबळ माजली, अचानक पिस्तुल पाहिल्यानंतर मालक सुध्दा घाबरले. गल्ल्यात असलेली दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी हिसकावली आणि तिथून पळ काढला.