सातारा : छोट्याशा कारणावरुन वाद होणं, हे काही आता नवं राहिलेलं नाही. किरकोळ वादातून टोकाच्या घटना वाढत असल्यानं आता चिंता व्यक्त केला जातेय. साताऱ्यात (Satara News) अशीच एक घटना घडली. रस्त्यातील गाडी वाजूला काढायला सांगितलं, म्हणून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. जीवघेणा हल्ला (Attempt to murder) केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतलाय. तिघांना अटकही केलीये. सध्या सातारा पोलीस (Satara crime News) याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. एकूण आठ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर अनेकदा किरकोळ कारणावरुन वाहन चालकांमध्ये वाद होत असतात. कधी हॉर्न वाजवल्यावरुन भांडण, कधी ओव्हरटेक केल्याचा राग, तर कधी कट मारल्याचं कारण…. वेगवेगळ्या कारणांवरुन याआधीही अनेक टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा साताऱ्यात घडलेल्या या घटनेनं रस्त्यावर होणाऱ्या वादाचं रुपांतर हत्येच्या प्रयत्नापर्यंत केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणी अटक करण्यात आलेली मुलं ही अवघी 20 ते 23 वर्षांची आहेत. अटक करण्यात आलेल्या मुलांची नावं खालीलप्रमाणे
अटक करण्यात आलेल्या तरुणांची सध्या पोलिसांकडून चौकशी केली जातेय. तर एकूण आठ जणांवर पोलिसांनी सदर घटनेप्रकरणी गुन्हे नोंदवून घेतलेत. दरम्यान, जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर साताऱ्यामधीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
@PMOIndia @ArvindKejriwal @DCPNewDelhi
Please help us , the Scorpio Car driver almost killed a few of our riders and threatened to kill us by crushing us under the car.
This is not what we vote for or pay taxes for
no one was severely injured
Gears respect riders pic.twitter.com/rcZIZvP7q4— ANURAG R IYER (@anuragiyer) June 5, 2022
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील एक व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला होता. रस्त्यावर एका स्कॉर्पिओ चालकानं भरधाव वेगानं गाडी चालवत बाईकवाल्याला कट मारली होती. यात बाईकवाल्याला स्कॉर्पिओची धडक बसली होती. त्यानंतर स्कॉर्पिओ चालकानं पळ काढला होता. हिट एन्ड रन प्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी यानंतर केली जात होती.
ही घटना घडण्याआधी बाईक रायडर्स आणि स्कॉर्पिओ चालकांमध्येही बाचाबाची झाली होती. स्कॉर्पिओ चालक बेदरकारपणे वाहन चालवत होता. त्याला शिस्तीत गाडी चालवण्यास बाईक रायडर्सच्या ग्रूपने सांगितलं होतं. पण त्यानंतर झालेल्या बाचाबाचीचा परिणाम हिट एन्ड रनमध्ये झाल्याचं दिसून आलं. यात एका बाईक रायडरला प्रचंड खरचटलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता साताऱ्यातही भर रस्त्यात जीवघेणा प्रकार उघडकीस आल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.