सातारा : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटी (Atrocity) प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार (Satara BJP MLA) आहेत. जयकुमार गोरेंसह पाच जणांवर फसवणूक, अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मयत माणसाला जिंवत दाखवून जमिनीचा दस्ताऐवज केल्याचा ठपका गोरेंवर ठेवण्यात आला आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दहीवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून जयकुमार गोरे यांच्यासह अन्य चार साथीदारांविरुद्ध ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक, जो मयत आहे, त्याला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज करून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केल्याचा गोरेंवर आरोप आहे. दहिवडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे
माण खटाव काँग्रेसचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपमध्ये दाखल झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात सख्खे बंधू शेखर गोरे यांनी आव्हान दिले होते. भाजपने हा मतदारसंघ जयकुमार गोरेंसाठी मागितला होता, तर शेखर गोरे यांना तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात बाह्या सरसावून सज्ज झाल्याने विधानसभा निवडणुकीची लढत रंगतदार झाली होती.
संबंधित बातम्या :
जयकुमार गोरे-शेखर गोरे पुन्हा आमनेसामने, एकमेकांविरोधात गुन्हे
भाजप आमदाराकडून अजितदादांचं तोंडभरुन कौतुक, मग दत्तामामांची थेट ऑफर!
सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार विरुद्ध शेखर गोरे, ‘माऊली संवाद’ला तुफान गर्दी