हारही सुकला नाही तोच…गाडीची काच फोडली… सातपुरला मध्यरात्री वाहनांची तोडफोड, सातपुर पोलीस काय करताय?

| Updated on: Jan 19, 2023 | 12:56 PM

नव्या गाडीचा आनंद साजरा केला जात असतांना काही काळच हा आनंद टिकून राहिला असून आनंदावर टवाळखोरांनी विरजण टाकल्याची चर्चा अधिक होऊ लागली आहे.

हारही सुकला नाही तोच...गाडीची काच फोडली... सातपुरला मध्यरात्री वाहनांची तोडफोड, सातपुर पोलीस काय करताय?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकच्या सातपुर परिसरात टवाळखोरांचा हैदोस पुन्हा एकदा समोर आला आहे. सातपुर परिसरात मध्यरात्रीच्या वेळी 10 वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नवी कोरी आणलेल्या कारची पूजा करून घातलेला हारही सुकलेला नसतांना गाडीची काच फोडण्यात आल्याने वाहन तोंडफोडीच्या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. मंगळवारी रात्रीच्या वेळी सातपुरच्या विविध भागात काही समाजकंटकांनी दहशत माजविण्याचा प्रकार समोर आल्याने सातपुर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी-सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांनी पोलिसांना ही बाब कळवली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पाहणी केली आहे. यावेळी नागरिकांनी टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करत वाहनांचे नुकसान कोण भरून देणार ? असा सवाल उपस्थित केला आहे.

नाशिक शहरात टवाळखोरांकडून दहशत निर्माण करण्यासाठी जाळपोळ, वाहनांचा काचा फोडणे असे प्रकार यापूर्वीही अनेकदा झाले आहे, मात्र तशाच घटना पुन्हा समोर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातपूरच्या अशोकनगर भागात मध्यरात्री वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या त्यामध्ये एका कुटुंबाने नुकतीच कार खरेदी केली होती, त्यामध्ये पूजा केलेला हारही सुकलेला नसतांना तीची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

नव्या गाडीचा आनंद साजरा केला जात असतांना काही काळच हा आनंद टिकून राहिला असून आनंदावर टवाळखोरांनी विरजण टाकल्याची चर्चा अधिक होऊ लागली आहे.

सातपुर पोलीसांनी या वाहन तोडफोडीची नोंद पोलीस ठाण्याच्या लेखी केली असून तपास सुरू केला आहे, परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून टवाळखोरांचा शोध घेतला जात आहे.

वाहनतोडफोडीच्या घटनेवरुन पोलीस काय भूमिका घेतात आणि काय कारवाई करतात याकडे सातपुरच्या अशोकनगर भागातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.