पुणे: मित्रासोबत गप्पा मारत उभ्या असलेल्या विद्यार्थीनीचा (Students) अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर उजेडात आला आहे. या प्रकरणी विद्यार्थीनीने चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये (Chatushrungi Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) अॅल्युमिनी हॉलच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.
दीपक सौदे याच्याविरुद्ध तरुणीने चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस त्या तरुणाची चौकशी करीत आहेत. सीसीटिव्हीचा आधार घेऊन पोलिस चौकशी करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. हा प्रकार 31 डिसेंबरच्या रात्री घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी तरुणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिच्या मित्रासोबत ती विद्यापीठातील अॅल्युमिनी हॉलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर 31 डिसेंबरच्या रात्री गप्पा मारत होती. त्यावेळी आरोपी सौदे तेथे आला. त्याने तरुणीला काही कारण नसताना तू कोणत्या डिपार्टमेंटची आहे. एवढ्या उशिरा काय करता, असे बोलून अश्लील शिवीगाळ केली. तसेच, पोलिसांची गाडी बोलावून आतमध्ये टाकण्याची धमकी देऊन निघून गेला. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दोन्ही बाजूने कसून तपास करीत आहेत.