crime news : मालवाहतूक रेल्वेची महिलेला धडक, ट्रेन अंगावरुन गेली, नंतर उठून उभ्या राहिलेल्या शिक्षिकेला पाहून गर्दी जमली

| Updated on: Feb 11, 2023 | 4:26 PM

ही घटना घडल्यानंतर ती महिला प्राथमिक उपचार केल्यानंतर सारखी बेशुद्ध होत होती. महिला शिक्षिकेने दुर्लक्षित केल्यामुळे तिचा जीव सुद्धा गेला असता.

crime news : मालवाहतूक रेल्वेची महिलेला धडक, ट्रेन अंगावरुन गेली, नंतर उठून उभ्या राहिलेल्या शिक्षिकेला पाहून गर्दी जमली
Image Credit source: Google
Follow us on

बिहार : एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका महिलेला मालवाहतूक रेल्वेची (Railways) जोराची धडक बसली. त्यानंतर ती रेल्वे महिलेच्या अंगावरुन गेली. तब्बल 30 डब्बे अंगावरुन गेल्यानंतर सुध्दा ती महिला सुरक्षित बाहेर निघाल्यामुळे अनेकांना आच्छर्य वाटलं आहे. त्या महिलेच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या महिलेचं नाव दुखी साव असं आहे. ती महिला प्राथमिक शिक्षिका (primary teacher) असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना काल सायंकाळी सहा वाजता घडली आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी आच्छर्य व्यक्त केलं आहे.

महिलेला धडक बसली. त्यामुळे ती महिला जागीचं खाली कोसळली

मालगाडी अचानक सुरु झाल्यामुळे समोर असलेल्या महिलेला धडक बसली. त्यामुळे ती महिला जागीचं खाली कोसळली, त्या महिलेच्या डोक्याला धक्का लागल्यामुळे ती महिला पटरीमध्ये पडली. त्यानंतर तिच्या अंगावरुन रेल्वे गाडीचे 30 डब्बे गेले. महिलेचा अपघात पटरी ओलांडत असताना झाला आहे. ज्यावेळी महिला ट्रेनखाली अडकल्याचं लोकांना समजल,त्यावेळी काही लोकांनी त्या महिलेचा व्हिडीओ तयार केला. ती महिला सध्या एकदम सुरक्षित असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

रुग्णालयात गेल्यानंतर बेशुध्द झाली होती

ही घटना घडल्यानंतर ती महिला प्राथमिक उपचार केल्यानंतर सारखी बेशुद्ध होत होती. महिला शिक्षिकेने दुर्लक्षित केल्यामुळे तिचा जीव सुद्धा गेला असता. परंतु त्या महिलेचं नशीब चांगलं म्हणून बचावली. तानकुप्पा रेल्वे स्थानकावर ओव्हरब्रिज नसल्यामुळे लोक ट्रेन पकडण्यासाठी अनेकदा मालगाडीच्या खाली रुळ ओलांडतात. अशा परिस्थितीत त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. लोक अजूनही विश्वास ठेवत नाहीत ती महिला जिवंत कशी राहिली.