पिकनिकला गेलेल्या शिक्षिकेला कारनं ठोकलं, हिट अँड रनच्या घटनेनं बदलापूर हादरलं

| Updated on: Jul 31, 2024 | 9:04 AM

आधी पुणे मग मुंबईत वरळी येथे दोन हिट अँड रनच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबईत पुन्हा एकदा अशीच एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील वरळी परिसरात घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असतानाच आता आणखी एक हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे.

पिकनिकला गेलेल्या शिक्षिकेला कारनं ठोकलं, हिट अँड रनच्या घटनेनं बदलापूर हादरलं
Follow us on

आधी पुणे मग मुंबईत वरळी येथे दोन हिट अँड रनच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबईत पुन्हा एकदा अशीच एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील वरळी परिसरात घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असतानाच आता आणखी एक हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. बदलापूरमध्ये ‘हिट अँड रन’ दुर्घटनेमध्ये एका शिक्षिकेला जीव गमवावा लागला आहे. बारवी धरणाच्या पुलावर कारने धडक दिल्यामुळे महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे संताप व्यक्त होत असून महिलेला धडक दिल्यानंतर पळून गेलेल्या कारचालकाला बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सुनीता पिंटूकर असे मृत महिलेचे नाव आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर मुरबाड रोडवर बारवी धरणाच्या ओव्हरफ्लो पुलावर हिट अँड रनचा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंबरनाथच्या पोतदार इंटरनॅशनल शाळेचे शिक्षक बारवी धरण परिसरात पावसाळी सहलीसाठी आले होते. सुमारे १५ ते २० शिक्षकांचा ग्रुप सहलीचा आनंद घेत होता. तेवढ्यात भरधाव वेगाने आलेल्या एका कारने शिक्षिकेला जोरदार धडक दिली. त्यामुळे सुनीता पिंटूकर या जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या हिट अँड रन घटनेनंतर कारचालक तिथून पळू गेला होता. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत अपघातास जबाबदार ठरलेला कारचालक सिद्धेश माळवे याला अटक केली.