रक्षकच ठरला भक्षक ! सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार,मुंबई पुन्हा हादरली

| Updated on: Aug 24, 2024 | 9:56 AM

बदलापूरमधील शाळेत दोन मुलींवर झालेला अत्याचार किंवा कोल्हापूरमध्ये अवघ्या 10 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या.... राज्यात विकृत नराधमांचे हे प्रकार वाढतच चालले असून संपूर्ण महाराष्ट्रातच संतापाची लाट उसळली आहे. लहान मुलींनाही हे नराधम सोडत नाहीत. हे सगळं कमी की काय म्हणून आता मुंबईतून पुन्हा असाच एक संतापजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला

रक्षकच ठरला भक्षक ! सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार,मुंबई पुन्हा हादरली
crime news
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

बदलापूरमधील शाळेत दोन मुलींवर झालेला अत्याचार किंवा कोल्हापूरमध्ये अवघ्या 10 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या…. राज्यात विकृत नराधमांचे हे प्रकार वाढतच चालले असून संपूर्ण महाराष्ट्रातच संतापाची लाट उसळली आहे. लहान मुलींनाही हे नराधम सोडत नाहीत. हे सगळं कमी की काय म्हणून आता मुंबईतून पुन्हा असाच एक संतापजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इमारतीच्या सुरक्षारक्षकानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचारा केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. रक्षकच भक्षक बनल्याची ही धक्कादायक घटना ओशिवरा परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 17 वर्षांची असून इमारतीच्या सुरक्षा रक्षकानेच तिच्या अत्याचार केला आहे. तो तिला जबरदस्ती बाथरूममध्ये घेऊन गेला आणि तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर पोलिसांनी 37 वर्षांच्या आरोपी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

४९ वर्षीय महिलेला तरुणाकडून बलात्काराची धमकी

मुंबईतील वांद्रे येथूनही एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एक तरूणाने 49 वर्षांच्या महिलेला बलात्काराची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे येथे घडला. संबंधित तरूण विरुद्ध दिशेने गाडी चालवत होता, म्हणून त्या महिलेने त्याला थांबवत जाब विचारण्याचा प्रय्तन केला. मात्र आपली चूक मान्य करणे राहिले बाजूला, त्या तरूणाने उद्दामपणे त्या महिलेलाच शिवीगाळ केली. एवढेचं नव्हे तर तिला बलात्काराची धमकी देखील दिली. या घटेनंतर त्या महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे येथील ज्या परिसरात हा गुन्हा घडला तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याआधारे आरोपीचा शोध सुरू आहे.