Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात दिवसाची पोलिस कोठडी, जाणून संपूर्ण प्रकरण

| Updated on: Mar 04, 2023 | 1:49 PM

तलासरी तालुक्यात डोंगारी भागात जेव्हा ही घटना उघडकीस आली, त्यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे शेजारच्या इसमाने अशा पद्धतीचं कृत्य केल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात दिवसाची पोलिस कोठडी, जाणून संपूर्ण प्रकरण
स्कूल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यू
Image Credit source: Google
Follow us on

पालघर : एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर (minor girl) एका 45 वर्षीय इसमाने बलात्कार करून गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी पालघरमध्ये (palghar crime story) घडली होती. त्यानंतर पोलिसांनी (palghar police) संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात पोलिस कोठडीची मागणी केली होती. ती कोर्टाने मान्य केल्याने आरोपीला आणखी सात दिवस पोलिसांच्या कोठडीत राहावे लागणार आहे. त्याचबरोबर आरोपीने याच्या आगोदर आणखी अशा पद्धतीचा गुन्हा केला आहे का ? याची पालघर पोलिस चौकशी करणार आहे. घराशेजारच्या इसमाने अशा पद्धतीचं कृत्य केल्यामुळे नेमका विश्वास ठेवायचा कुणावर असा प्रश्न पालकांना पडला आहे.

लैंगिक अत्याचार करून गळा दाबून खून केला

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील डोंगारी येथे 4 थीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली 10 वर्षीय मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली, त्यावेळी घराजवळ राहणाऱ्या आरोपी रमेश दुबळा याने स्कुटरवर शाळेत सोडण्याच्या बहाण्याने अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून खून केला. पोलिसांनी अवघ्या काही तासात तपास करत नराधम आरोपीला अटक केली होती. या आरोपीला शुक्रवारी पालघर न्यायालयात हजर केले असता, त्या नराधम हत्याऱ्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्याचबरोबर आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याचा तपास केल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नागरिकांनी संताप व्यक्त केला

तलासरी तालुक्यात डोंगारी भागात जेव्हा ही घटना उघडकीस आली, त्यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे शेजारच्या इसमाने अशा पद्धतीचं कृत्य केल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी आरोपीची कोठडी मागवून घेतली आहे. त्यामुळे आरोपीची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा