सांगली : मिरजेत चोरीच्या प्रकरणी शिवसेना (Shiv Sena) शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना अटक करण्यात आली आहे. एन रामकृष्ण या कंपनीच्या जुन्या चेकबुक पुस्तकातील 20 लाख रुपये रक्कमेचा चेक चोरून चंद्रकांत मैंगुरे यांनी बँकेच्या खात्यावरून 15 लाख 17 हजार 205 रुपये काढून चोरी केली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
याप्रकरणी शहरात हनुमान मंदिराजवळ वास्तव्यास असलेले मधुकुमार यांनी मिरज शहर महात्मा गांधी चौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी चंद्रकांत मैंगुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याप्रकरणी चंद्रकांत मैंगुरे यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पोलिसांनी मैंगुरे यांना शुक्रवारी (16 जुलै) अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :
पुरंदरमध्ये मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची हत्या
भिवंडीत अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने चिमुरड्याची अपहरण करून हत्या