Breaking : बीडमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, तलवारीने वार, पती-पत्नी जखमी

| Updated on: Mar 15, 2022 | 11:01 PM

शहरातील पेठबीड भागात शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झालाय. रामसिंग टाक असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. टाक पती-पत्नीवर तलवारीने वार करण्यात आले असून, यात ते दोघेही जखमी झाले आहेत.

Breaking : बीडमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, तलवारीने वार, पती-पत्नी जखमी
बीडमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
Image Credit source: TV9
Follow us on

बीड : शहरातील पेठबीड भागात शिवसेनेच्या (Shivsena) एका माजी नगरसेवकावर (Former Corporator) प्राणघातक हल्ला झालाय. रामसिंग टाक असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. टाक पती-पत्नीवर तलवारीने वार (Sword Attack) करण्यात आले असून, यात ते दोघेही जखमी झाले आहेत. जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु करण्यात आलाय.

बीडमध्ये पोलिसांचा धाक उरला नाही काय?

बीड शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांत गुन्हेगारी वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आज शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहराच्या पेठ बीड भागात ऐन वर्दळीच्या वेळी शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. रामसिंग टाक यांच्यावर जुन्या कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही जखमी झाले आहेत. या हल्ल्यात रामसिंग टाक गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आलाय. दरम्यान, वर्दळीच्या वेळी घडलेल्या या घटनेने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. 

शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अनिल जगताप

दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख पद रिक्त होते. अखेर चार महिन्यानंतर शिवसेनेचे निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक अनिल जगताप यांच्या गळ्यात पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची माळ शिवसेना पक्षप्रमुखांनी टाकली आहे. सोमवारी जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्यानंतर आज नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे बीडमध्ये दाखल झाले होते. दरम्यान यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केलं आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करुन शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला आहे. यावेळी जेसीबीने फुलांची उधळण करून अनिल जगताप यांची मोठी मिरवणूक शिवसैनिकांकडून काढण्यात आली. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर आली होती. त्यामुळे आता अंतर्गत गटबाजी बाजूला सारून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोट बांधण्याच आव्हान जिल्हाप्रमुख जगताप यांच्या समोर असणार आहे.

इतर बातम्या :

खळबळजनक! बीड एसटी डेपोत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह

Sangli Crime : सांगलीत वाळू तस्करांची मुजोरी, चक्क महिला तहसिलदार यांच्या गाडीवरच घातली गाडी