नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) तळोजामध्ये (Taloja) एका इमारतीच्या लिफ्टमध्ये धक्कादायक घटना उजेडात आली आहे. विशेष म्हणजे ही घटना सीसीटिव्हीमध्ये (CCTV) कैद झाल्यामुळे आरोपीला पकडणं पोलिसांना सोपं गेलंय. महिला ज्या सोसायटीत काम करते. त्याच सोसायटीत ही व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
तळोजामध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हा प्रकार घडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. कामवाली महिला आपलं काम आटोपून घरी निघाली आहे. त्यावेळी इमारतीच्या लिफ्टमध्ये कामवाली महिले समोर एका व्यक्तीने अश्लील कृत्य केल आहे.
महिलेने तळोजा पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी लिफ्टमधील सीसीटिव्ही तपासला आरोपी दोषी आढल्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यातं आलं आहे. आरोपीच्या विरुद्ध 354 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी त्याच सोसायटीत राहत असल्याने पोलिसांना तात्काळ अटक केली. तळोजा पोलीस आरोपीची अधिक तपासणी करीत आहे.