सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांच्या आत्महत्या (Sangli suicide)केल्याची धक्कादायक घटना 20 जून 2022 रोजी घडली होती. या सामूहिक आत्महत्या प्रकरमामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता या 9 जणांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. ही आत्महत्या नसून जेवणात विष कालवून सर्वांची हत्या(Murder) करण्यात आली. पोलिस तपासात याबबात खळबळजनक खुलासा झाला आहे(Sangli Police). या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या हत्या प्रकरणात दोन जणांचा समावेश आहे. दोघा संशयीत आरोपींना सांगली पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे. आब्बास महम्मद अली बागवान (वय ४८ वर्षे) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय ३० वर्षे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही सोलापुर येथे राहणारे आहेत. यांनीच या संपूर्ण कुंटूंबाला जेवणातून विष देऊन त्यांनी हत्या केल्याचा संशय आहे. सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत माहिती दिली. यांनी हत्या नेमकी कशा प्रकारे केली, हत्या करण्यामागे त्यांचा उद्देश काय? संशयीत आरोपी या कुंटूबियाच्या परिचयाचे आहेत काय? या सर्व प्रश्नांचा तपास पोलिस करत असून लवकरच सर्व सत्य समोर येईल.
20 जून रोजी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांच्या आत्महत्येची बातमी आली संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. ही आत्महत्या सावकारी कर्जामुळे झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी 13 जणांना अटक (Arrest) करण्यात आली होती.
या घटनेमुळे जिल्हा हादरला होता. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे दोन सख्खे भाऊ एक शिक्षक आहे आणि दुसरा पशु वैद्यकीय डॉक्टर या दोन्ही दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी 9 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळजनक माजली होती. डॉक्टर माणिक वनमोरे दाम्पत्याचा घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या शिक्षकाच्या घरात तीन मृतदेह आढळले होते.
आत्महत्या केलेल्या दोघा भावांच्या खिशात दोन चिट्ठ्या सापडल्या आहेत. त्यामध्ये अनेकांची नावे आहेत. त्यांनी सावकारी कर्ज घेतले आहे. व्यापारासाठी कर्ज घेतले होते असे चिट्ठीमध्ये लिहीले होते. त्यामुळे पोलिसांनी कर्ज देणाऱ्या या सावकारांची कसून चौकशी केली.