सातारा : अंडी उधार न दिल्याच्या रागातून एका दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात (Shopkeeper Murder Due To Not Lend Eggs) आल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयितांनाही ताब्यात घेतलं आहे (Shopkeeper Murder Due To Not Lend Eggs).
साताऱ्यातील यवतेश्वर पॉवर हाऊसजवळ बबन हणमंत गोखले (वय 42) यांचं दुकान आहे. शुभम कदम, सचिन माळवे हे त्यांच्या दुकानात गेले आणि त्यांना अंडी उधार देण्याची मागणी केली. पण, बबन यांनी अंडी उधार देण्यास नकार दिला.
बबन यांनी नकार दिल्याने हे दोघेही संतापले. त्यांनी रागाच्या भरात बबन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर दगड आणि धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये बबन यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवे या दोघांना पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी फक्त अंडी उधार न देण्याच्या रागातून ही हत्या केली की यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
मित्राच्या शरिराचे 11 तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले, खुनी नवरा-बायकोला बेड्याhttps://t.co/f52FFYfDuL#Murder #Crime #Raigad #Neral
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 18, 2020
Shopkeeper Murder Due To Not Lend Eggs
संबंधित बातम्या :
दोन महिन्याच्या चिमुरडीची बापाकडून हत्या, इंदापुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना
50 महिलांची छेड काढणारा गुन्ह्यानंतर घर का बदलत होता?
हुंडा न दिल्याने लग्न मोडलं, मुलगीही घरातून गायब; उद्विग्न बापाची गळफास घेऊन आत्महत्या
धक्कादायक, विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शिक्षकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या