दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याची नार्को टेस्ट अखेर पूर्ण झाली आहे. दोन तास ही नार्को टेस्ट चासली. या नार्को टेस्टनंतर आता श्रद्धाच्या हत्येचं गूढ लवकर उलगण्याच्या मार्ग मोकळा होतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, 2 तासांच्या या नार्को टेस्टचा रिपोर्टही काय होतो, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आंबेडकर रुग्णालयात ही नार्को टेस्ट पार पडली. कशी करतात नार्को टेस्ट? हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
आज सकाळी 10 वाजता आफताब पुनावाला याच्या नार्कोट टेस्टला सुरुवात झाली होती. 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत नार्को टेस्ट पार पडली. आंबेडकर रुग्णालयात या नार्को टेस्ट आधी चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
याआधी आफताब पुनावाला याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी यावेळी घेण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाकडून मिळालेल्या परवानगीनंतर अखेर ही नार्को टेस्ट करण्यात आली.
सकाळी दिल्ली पोलीस आफताबला चोख बंदोबस्तात आंबेडकर रुग्णालयात घेऊन पोहोचले होते. यानंतर एक वरिष्ठ एनेस्थेशिया एक्स्पर्ट, एसएसएलचे एक सायकॉलॉजिस्ट एक्स्पर्ट, एक ओटी अटेंडंट आणि एफएसएलचे दोन फोटो एक्स्पर्टही नार्को टेस्ट दरम्यान उपस्थित होते.
नार्को टेस्ट दरम्यान, एसएसएलचे एक सायकॉलॉजिस्ट एक्स्पर्ट यांनी आफताब पुनावाला यांना प्रश्न विचारले. तर एफएसएलच्या दोन फोटो एक्स्पर्टही या नार्को टेस्टचं रेकॉर्डिग केलं. नार्को टेस्ट करण्याआधी आफताब पुन्हा वाला याची आधी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला एनेस्थेशिया देऊन त्याला प्रश्न विचारण्यात आले.
पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब पुनावाला याने पोलिसांसमोर आपल्या हत्येची कबुली दिली आहे. आपणत श्रद्धाची हत्या केली असून या हत्येचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचही आफताबने आधीच कबूल केलं आहे. दरम्यान, आता अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नार्को टेस्टमधून उलगडली जातात का, हे पाहणं महत्त्वाचंय.
नार्को टेस्ट झाली असली तरी आफताब पुनावाला यांच्या पॉलिग्राफ टेस्टचा रिपोर्टही अद्याप आलेला नाही. या रिपोर्टचीही पोलिसांना प्रतीक्षा आहे.
12 नोव्हेंबर रोजी आफताब पुनावाला याला पोलिसांनी श्रद्धाच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. 18 मे रोजी श्रद्धाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. गळा दाबून आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले होते. यानंतर एक एक करुन रोज रात्री तो हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फेकून देत होते. मात्र अजूनही श्रद्धाच्या शरीराचे बहुतांश तुकडे सापडलेले नाही. आता श्रद्धाचा जबडा आढळून आला आहे. मात्र अजूनही हत्येशी संबंधित अनेक प्रश्नांचं गूढ कायम आहे.