दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आता या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. सध्या श्रद्धाचा एक दोन वर्षापूर्वीचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन आफताब तिला मारहाण करायचा हे सिद्ध होते. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी आज दिल्ली पोलीस गुरुग्राममध्ये दाखल झाले.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. यावरुन आफताब श्रद्धाला मारहाण करत असल्याचे स्पष्ट होते. या मारहाणीनंतर जखमी श्रद्धाला तीन दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते.
श्रद्धाला आफताबसोबत दिल्लीला शिफ्ट व्हायचे होते. मात्र आफताब यासाठी तयार नव्हता. तसेच आफताब सतत कुणाशी तरी चॅटिंग करत असायचा. श्रद्धाने याबाबत विचारताच सारवासारव करायचा. यातूनच दोघांमध्ये भांडणं व्हायची, असे दिल्ली पोलीस सूत्रांनी सांगितले.
दोघांमधील भांडण आणि दुरावा मिटावा यासाठी आफताबा श्रद्धाला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड टूरवर घेऊन गेला होता.
श्रद्धा हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलिसांचे पथक वसईत आले आहे. या पथकाने श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर आणि श्रद्धा आफताबसोबत ज्या रुममध्ये भाड्याने रहायची त्या घरमालकाची 8 तास चौकशी केली.
पोलिसांनी दोघांचेही जबाब नोंदवले आहेत. आज सकाळी साडे अकरा ते सायंकाळी साडे सातपर्यंत दिल्ली पथकाने माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या कार्यालयात ही चौकशी केली.
या सर्व घटनेचा आम्ही कसून तपास करत असून, आज दोघांची चौकशी करून जबाब घेण्यात आले असल्याचे दिल्ली पथकातील तापास अधिकाऱ्यांनी सांगितले.