नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणारे बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाच्या पोलीस कसून तपास करत आहेत. श्रद्धाचा मारेकरी आणि लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याला अटक केल्यानंतर, पोलीस चौकशीत त्याने हत्येची कबुली केली. मात्र कोर्टात खटला दाखल झाल्यानंतर सुनावणीदरम्यान आरोपीने जबाब बदलला, तर केस डेड होईल. यामुळेच पोलीस आरोपींची नार्को टेस्ट करतात. नार्को टेस्टमध्ये मोठमोठे गुन्हेगारही पोपटासारखे बोलू लागतात. जाणून घ्या हे ड्रग नक्की काय आहे.
अनेकदा अत्यंत घृणास्पद गुन्हा करणाऱ्यांचे मनही तितकेच गोंधळलेले असते. त्यांना पोलिसांनी त्यांना पकडले तरी त्यांचा गुन्हा सिद्ध करणे सोपे नसते.
पुराव्याअभावी न्यायालयालाही आरोपींना सोडण्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत कठीण प्रकरणे सोडवण्यासाठी नार्को टेस्टची मदत घेतली जाते.
यामध्ये आरोपीला शिरेमध्ये इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शननंतर आरोपी सर्व सत्य सांगतो. हे सर्व अर्ध बेशुद्ध अवस्थेत घडते.
या चाचणीअंतर्गत इंजेक्शनमध्ये एक प्रकारचे सायकोअॅक्टिव्ह औषध मिसळले जाते, ज्याला ट्रूथ ड्रग असेही म्हणतात. त्यात सोडियम पेंटोथल नावाचे केमिकल असते, जे शिरेमध्ये जाताच व्यक्ती काही मिनिटे किंवा बराच काळ बेशुद्धावस्थेत जातो. हे डोसवर अवलंबून असते. यानंतर, जागृत असताना, अर्ध-चेतन अवस्थेत, तो बिनदिक्कतपणे सर्व सत्य सांगतो.
हे औषध खरं तर खूप घातक आहे. थोडीशी जरी चूक झाली तर माणूस मरू शकतो, कोमात जाऊ शकतो किंवा आयुष्यभरासाठी अपंग होऊ शकतो. यामुळेच जवळजवळ प्रत्येक देशात नार्को चाचणीवर बंदी घालण्यात आली. एखाद्या विशिष्ट प्रकरणात न्यायालयाने मान्यता दिली तरच ही चाचणी करता येते.