श्रीगोंदा (अहमदनगर) : श्रीगोंदा पोलिसांना (Shrihonda Police) गेल्या सहा वर्षांपासून मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना पकडण्यात यश आलंय. संतोष ऊर्फ वंट्या दिलीप काळे आणि राहुल भारत चव्हाण, या दरोडेखोरांना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले (Ramrao Dhikale) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शेडगाव जवळा येथे कोंबिंग ऑपरेशन करत असताना अटक केली. (Shrigonda police arrested the accused who have been absconding in the Moka crime for the last six years)
संतोष काळे आणि राहुल चव्हाण हे दोघेही अट्टल दरोडेखोर होते. त्यांनी अनेक चोऱ्या केल्या असून त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला होता. मात्र गेल्या सहा वर्षांपासून ते फरार होते. अखेर श्रीगोंदा पोलिसांनी त्यांना अटक केलीये.
शेडगाव येथे 25 तारखेला रंजना मारुती भदे (रा. शेडगाव) या महिलेच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून काही हजारांचा ऐवज त्यांनी लंपास केला होता. या प्रकरणातील आरोपी संतोष काळे हा जवळा येथील असला तरी गणेशवाडी येथे राहून तो दरोडे, चोऱ्या करीत होता. संतोषवर लोणी काळभोर, उरुळी कांचन, श्रीगोंदे, जामखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. पण तो 6 वर्षांपासून फरारी होता.
राहुल भारत चव्हाण याच्याविरोधात बारामती तसंच श्रीगोंदा पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत. श्रीगोंदा पोलिस कोंबिंग ऑपरेशन करत असताना दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक केलीय. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, हेड कॉस्टेबल अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, गोकुळ इंगवले, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर यांनी ही कारवाई केली.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा यालाच मोक्का असं म्हणतात. मोक्का हे कायद्याचं नाव आहे. भारतीय दंड विधान संहितेच्या कलमाखाली गुन्हेगार, टोळ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याचे संबंधित तपास अधिकाऱ्याला वाटल्याने गुन्हेगारांच्या शेवटच्या गुन्ह्याचा दाखला देऊन अधिकारी ‘मोक्का’नुसार कारवाई नोंदवतात.
(Shrigonda police arrested the accused who have been absconding in the Moka crime for the last six years)
हे ही वाचा :
खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!